भिवंडीतील दोन वकिलांच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 07:41 AM2017-08-17T07:41:05+5:302017-08-17T07:41:21+5:30

ठाणगेआळी येथील बळवंत कृपा या तीन मजली इमारतीत राहणाऱ्या दोन वकीलांच्या घरी चोरी झाल्याचे रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आले असून या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात रात्री ११.३० वाजता तक्रार नोंदविली

Stole at two lawyers' house at Bhiwandi | भिवंडीतील दोन वकिलांच्या घरी चोरी

भिवंडीतील दोन वकिलांच्या घरी चोरी

Next

भिवंडी, दि. 17 - ठाणगेआळी येथील बळवंत कृपा या तीन मजली इमारतीत राहणाऱ्या दोन वकीलांच्या घरी चोरी झाल्याचे रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आले असून या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात रात्री ११.३० वाजता तक्रार नोंदविली आहे. बळवंतकृपा या इमारतीतील पहिल्या मजल्यावर वकील श्रीकांत लंगडे हे रहात असुन दुसऱ्या मजल्यावर त्यांचे घरवजा कार्यालय आहे. याच कार्यालयाशेजारी वकील प्रसाद शेपाळ यांचा ब्लॉक आहे.

या दोन्ही वकिलांच्या कुटुंबातील सदस्य आज दिवसभर घराबाहेर असल्याची संधी साधत चोरांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन कडीकोयंडा तोडला. त्यांनी प्रसाद शेपाळ यांच्या घरातील कपाट डुब्लिकेट चावीने उघडून त्यामधील अडीच तोळे सोन्याचे दागिने व ६० हजारांची रोख रक्कम चोरली. तर वकील लंगडे यांच्या कार्यालय वजा ब्लॉकची कडी तोडून त्यांच्या कपाटातील अडीच तोळे सोन्याचे दागीने व ४०हजार रोख रक्कम चोरांनी चोरून नेली.मात्र चोराने चांदीच्या वस्तू नेल्या नाहीत अथवा कोणत्याही वस्तूला हात लावला नाही.

रात्री ८-३० वाजताच्या सुमारास लंगडे व शेपाळ कुटूंबीय घरी आले असता त्यांना घरातील दागीने चोराने चोरून नेल्याचे समजले.त्यांनी ही घटना निजामपूर पोलीस चौकीत सांगीतली असता पोलीसांनी तत्परता न दाखविता त्यांनी इमारतीला कँमेरे लावण्याचा सल्ला दिला.तेंव्हा त्यांनी घरातील इतर वस्तूंची तपासणी करीत गेलेल्या वस्तूंची यादी बनविली आणि तडक काप आळीतील मनपाच्या इमारतीतील निजामपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

Web Title: Stole at two lawyers' house at Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.