भिवंडीतील रेशन चोरीला आळा? ई-पास मशीनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:12 AM2017-09-07T02:12:33+5:302017-09-07T02:12:46+5:30
शहरातील शिधावाटप दुकानदारांना ग्राहकांची नोंद करून धान्य देण्यासाठी ई-पास (पॉइंट आॅफ सील) या मशीनचे वाटप करण्यात आले. यामुळे रेशनचे धान्य संबंधित ग्राहकालाच मिळेल आणि त्याच्या चोरीला आळा बसेल.
भिवंडी : शहरातील शिधावाटप दुकानदारांना ग्राहकांची नोंद करून धान्य देण्यासाठी ई-पास (पॉइंट आॅफ सील) या मशीनचे वाटप करण्यात आले. यामुळे रेशनचे धान्य संबंधित ग्राहकालाच मिळेल आणि त्याच्या चोरीला आळा बसेल.
ई-पॉज मशीन ज्या दुकानांत बसवले आहे, त्या दुकानांमधील ग्राहकांच्या अंगठ्यांचे ठसे नोंदवण्यात येतील. ग्राहक धान्य घ्यायला आल्यावर त्याने दिलेला अंगठ्याचा ठसा हा त्याच्या अंगठ्याला मॅच करून तोच ग्राहक असल्याची खातरजमा केली जाईल आणि मगच त्याला धान्य दिले जाईल. ग्राहकाने किती धान्य घेतले व कोणते धान्य घेतले, याची नोंद या मशीनद्वारे केली जाणार असल्याने चोरीला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. सोमवारी दुपारी गोपाळनगर येथील पाटेदारवाडीमध्ये १८७ रेशनिंग दुकानदारांना मशीनचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी ठाणे शिधावाटप विभागाचे उपनियंत्रक नरेश वंजारी, शिधावाटप अधिकारी महेश जोशी व ३७ फ चे शिधावाटप अधिकारी एम.जी. गिरी उपस्थित होते.