ठाण्यातील एटीव्हीएम मशीन बंद, तिकीट खिडक्यांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:22 AM2017-09-03T05:22:43+5:302017-09-03T05:22:48+5:30
ऐतिहासीक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमकडील तब्बल १२ एटीव्हीएम मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे तिकीट खिडक्यांवर गर्दी वाढल्याचे चित्र सध्या आहे.
ठाणे : ऐतिहासीक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमकडील तब्बल १२ एटीव्हीएम मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे तिकीट खिडक्यांवर गर्दी वाढल्याचे चित्र सध्या आहे. याबाबत एका प्रवाशाने लेखी तक्रार केल्याने आतातरी त्या तातडीने सुरू होतात का हे पाहावे लागणार आहे.
तिकिटासाठी लागणारा वेळ वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएम मशीन मध्य रेल्वेच्या स्थानकांमध्ये बसविण्यात आले. त्यानुसार, ठाणे स्थानकात एकूण २१ एटीव्हीएम मशीन बसविल्या आहेत. या मशीन पश्चिम आणि पूर्वेकडील रेल्वे फलाट परिसरासह सॅटीस पुलावरही आहेत. यामधील पश्चिमकडील सॅटीस पूल वगळता, तिकिट खिडक्यांजवळील १२ एटीव्हीएम मशीन ३१ आॅगस्टपासून बंद आहेत. त्यामुळे रेल्वेचे तिकिट काढून देणारे ही तेथून गायब झाले आहेत. ज्या प्रवाशांकडे स्मार्टकार्ड असूनही मशीन बंद असल्याने त्यांनाही रांगेत उभे रहावे लागत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाडामुळे या मशीन बंद असल्याचे सांगितले.