स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावाखाली नागरिकांना त्रास देणं थांबवा; मनसेचं आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 05:16 PM2021-06-22T17:16:52+5:302021-06-22T17:17:11+5:30
महापालिका कारवाईचा सर्वस्तरातून निषेध होत असून इमारतीची वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबवावी. असे निवेदनात म्हटले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : इमारतीच्या स्ट्रॅक्टरल ऑडिटच्या नावाखाली पाणी व वीज पुरवठा महापालिका खंडित करीत आहे. सदर कारवाई थांबविण्याचा इशारा मनसेने देऊन आयुक्तांच्या कार्यालय बाहेर ठिय्या आंदोलन करून नाराजी व्यक्त केली आहे. उल्हासनगरात गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. या पाश्वभूमीवर महापालिकेने १० वर्ष जुन्या व धोकादायक अश्या १५०० पेक्षा जास्त इमारतींना बांधकाम विभागाकडून स्ट्रॅक्टरल ऑडीटच्या नोटिसा पाठविल्या.
याप्रकारने नागरिकांत संभ्रमाचे व भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान स्ट्रॅक्टरल ऑडिटची प्रत सादर न करणाऱ्या काही इमारतीचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याचा आरोप मनसेचे बंडू देशमुख यांनी केला. कोरोनाच्या महामारीत असंख्य नागरिकांचा रोजगार जाऊन बेरोजगार झाले. तर अनेकांच्या वेतनात मोठी कपात झाली. तसेच व्यवसाय व धंदे ठप्प पडल्याने, हजारो नागरिकांना आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. अश्यावेळी आयुक्तांनी काढलेल्या आदेशाने हजारो नागरिक बेघर होण्याची शक्यता बंडू देशमुख यांनी व्यक्त केली.
महापालिका कारवाईचा सर्वस्तरातून निषेध होत असून इमारतीची वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबवावी. असे निवेदनात म्हटले. गेल्या महिन्यात इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या घटनेतून आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी घाईघाईने हजारो नागरिक बेघर होतील असा निर्णय घेऊ नये. असा इशारा दिला. सन १९९४ ते ९८ दरम्यान बांधलेल्या सर्वच इमारतींना नोटिसा देऊन नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप मनसेने केला. महापालिकेने नोटिसा देण्यापूर्वी स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याची यंत्रणा शहरात व महापालिकेकडे आहे का?. याचे सुरवातीला संशोधन करण्याची गरज होती. असेही मनसेचे बंडू देशमुख यांनी म्हटले. दरम्यान मंगळवारी दुपारी मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून आयुक्तांची भेट घेत वीज व पाणी खंडित करण्याची कारवाई थांबविण्याची मागणी केली. आयुक्तांनी आश्वासन दिल्याची माहिती बंडू देशमुख यांनी दिली.
इमारतीचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबवा, मनसेची मागणी, उल्हासनगर महापालिका आयुक्त कार्यालयाला बाहेर मनसेचं ठिय्या आंदोलन, आयुक्तांविरोधात घोषणाबाजी @mnsadhikrutpic.twitter.com/nUGEPL8Ks6
— Lokmat (@MiLOKMAT) June 22, 2021
आयुक्तांच्या कार्यालय बाहेरील ठिय्या आंदोलनात मनसेचे कल्याण जिहाध्यक्ष सचिन कदम, संजय घुगे, बंडू देशमुख, प्रदिप गोडसे, सचिन बेंडके, मुकेश सेठपलानी, सुभाष हटकर, मैनुऊदिन शेख, प्रविण माळवे, अक्षय धोञे, सागर चौहाण, सुहास बनसोडे, प्रमोद पालकर, बादशाहा शेख, तन्मेश देशमुख, रवी बागुल, मधूकर बागुल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप - रिपाईचा मोर्चा
महापालिका आयुक्त डॉ राजा रिजवानी यांच्या इमारतीचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ भाजप व रिपाईचे शुक्रवारी मोर्चाचा इशारा दिला. ऐकूनच आयुक्तांच्या निर्णयाने शहरात नाराजी व्यक्त होत असून सत्ताधारी शिवसेना व महापौरांच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे.