‘अवैध धंदे थांबवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:41 AM2021-04-01T04:41:16+5:302021-04-01T04:41:16+5:30
---------------------------------------------------- ‘पत्रकारांना लस द्या’ कल्याण : डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस यांच्या प्रमाणे पत्रकारांनीही वर्षभरापासून कोविड काळात आपले कर्तव्य ...
----------------------------------------------------
‘पत्रकारांना लस द्या’
कल्याण : डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस यांच्या प्रमाणे पत्रकारांनीही वर्षभरापासून कोविड काळात आपले कर्तव्य बजावले आहे. त्यात अनेक पत्रकारांना कोविडची बाधाही झाली होती. मात्र, त्यावर मात करत ते कामावर रुजू झाले आहेत. मात्र, सध्याचे वाढते रुग्ण विचारात घेता केडीएमसी हद्दीतील पत्रकारांचे लसीकरण व्हावे, अशी मागणी निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन कल्याण-डोंबिवली या पत्रकार संघाने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
---------------------------------------------------
राधिका गुप्ते यांचा गौरव
कल्याण : गोरखपूर विश्व विद्यालयाने भरवलेल्या नाथ संप्रदाय आंतरराष्ट्रीय परिषदेत नाथ संप्रदाय संशोधनावर सर्वोत्कृष्ट संशोधनात्मक भाषण केल्याबद्दल कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातील प्रा. डॉ. राधिका गुप्ते यांचा प्रथम क्रमांकाने गौरव करण्यात आला. विश्वविद्यालयाच्या गोरक्ष शोध पीठ आंतरराष्ट्रीय परिषदेत १३ देश सहभागी झाले होते. त्या परिषदेसाठी गुप्ते यांना आमंत्रित केले होते. या परिषदेत सर्वोत्कृष्ट संशोधनात्मक भाषण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यापूर्वीही त्यांना संत साहित्याबद्दल स्त्रीरत्न पुरस्कार देऊन गौरविले होते.
---------------