वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंटच्या प्रकल्पांची कामे थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:56 PM2018-10-23T23:56:01+5:302018-10-23T23:56:05+5:30
बफरझोन निर्माण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे खाडी किनारी सुरू असलेल्या वॉटर फ्रन्ट सारखे प्रकल्प आधीच अडचणीत आले होते. परंतु, आता त्यांना आणखी एक धक्का बसला आहे.
ठाणे : खारफुटींपासून ५० मीटर अंतरापर्यंत जर काही बांधकामे झाली असतील तर त्यांच्यावर कारवाई करून बफरझोन निर्माण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे खाडी किनारी सुरू असलेल्या वॉटर फ्रन्ट सारखे प्रकल्प आधीच अडचणीत आले होते. परंतु, आता त्यांना आणखी एक धक्का बसला आहे.
परवानगीशिवाय या प्रकल्पांचे काम सुरू असून सीआरझेडचेही उल्लघंन केले जात असल्याने तेथील काम तत्काळ बंद करावे, असे आदेश एमसीझेडसीएम अर्थात महाराष्टÑ किनारपट्टी व्यवस्थापन नियामक मंडळाने ठामपाला दिले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प तर अडचणीत आले आहेतच शिवाय या प्रकल्पांवर केलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे शहराला ३२ किमीचा खाडी किनारा लाभला आहे. त्यांचा विकास करण्याचा कार्यक्रम ठाणे महापालिकेने हाती घेतला होता. त्यानुसार १३ ठिकाणी खाडी किनाऱ्यांचा विकास केला जाणार होता. त्यानुसार पहिल्या टप्यात ७ ठिकाणच्या वर्क आॅडर्रही दिल्या आहेत. त्यातील प्रत्यक्षात चार ठिकाणी कामही सुरूकेले आहे. खारेगाव, नागलाबंदर, कोपरी, साकेत आणि बाळकुम येथील खाडी किनारा विकसित करण्यासाठी ठाणे महापालिकेने नियोजन केले आहे. या प्रकल्पांसाठी २२२ कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यानुसार येथील कामांनासुद्धा सुरुवात झाली आहे. तर, कोलशेत, वाघबीळ, कळवा येथील काम दुसºया टप्यात सुरू होणार आहे. मात्र, खाडी किनाºयावरील जागा पाणथळभूमी असून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने या ठिकाणी उद्यान, जॅगिंग ट्रॅक सारख्या सोयी देताना पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात पाणी साचून परिसरामध्ये हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यानुसार एक हजार चौरस मीटरपेक्षा जास्त घनता असलेल्या खारफुटीच्या क्षेत्राभोवती ५० मीटर बफर झोन निर्माण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यामुळे पालिकेने प्रस्तावित केलेले वॉटरफ्रन्ट डेव्हलपमेंटचे प्रकल्प अडचणीत आले आहेत. त्यात हा एक मोठा धक्का बसला आहे. महाराष्टÑ किनारपट्टी व्यवस्थापन नियामक मंडळाने प्रकल्पांची कामे थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती जोशी यांनी दिली.
.कुठल्याही परवानग्या न घेतल्याने काम थांबवण्याच्या सूचना
ठामपाला २०१५ मध्ये बाळकुम येथील खाडीकिनारा विकसित करण्यासाठी मंडळाकडून तत्त्वत: मंजुरी दिली होती; परंतु त्या जोरावर त्यांनी इतर ठिकाणीसुद्धा कोणत्याही स्वरुपाची परवानगी न घेता, कांदळवन नष्ट होणार आहे, हे माहीत असूनही काम सुरू केल्याचे समोर आले आहे.न्यायालयीन आदेशानुसार झालेल्या चौकशीदरम्यान गायमुख येथे खारफुटीची कत्तल आणि भराव टाकल्याचे सिद्ध झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे; परंतु आता त्या ठिकाणी कांदळ नव्हतेच हे सिद्ध करण्यासाठी पालिकेची धडपड सुरूअसल्याची माहिती आहे. एकूणच आता मंडळानेच या कामात सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसत असून ठामपाने कुठल्याही परवानग्या घेतल्या नसल्याने काम थांबविण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे खाडी किनाºयांचा विकास करण्याचा प्रयत्न करणाºया ठाणे महापालिकेला हा मोठा धक्का मानला जात आहे.