‘सोशल मिडियावर जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करणाऱ्यांना वेळीच अटकाव करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 04:01 PM2020-04-09T16:01:45+5:302020-04-09T16:06:54+5:30

एकीकडे अभियंत्याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी अभियंत्याला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच राज्यभर गाजत आहे. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करणाऱ्यांना वेळीच अटकाव करा, अशी मागणी ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

'Stop timely targeting of Jitendra Awhad on social media' | ‘सोशल मिडियावर जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करणाऱ्यांना वेळीच अटकाव करा’

राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना साकडे

Next
ठळक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना साकडेआव्हाड यांच्यावर अत्यंत अश्लील भाषेत टीकायामुळेच कार्यकर्त्यांकडून उद्रेक होत असल्याचा केला दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सोशल मिडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत अश्लील भाषेत टीका करण्यात येत आहे. त्यांची हत्या करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांकडून उद्रेक होत आहे. अशा समाजकंटकांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.
परांजपे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनंत करमुसे याने अत्यंत गलिच्छ शब्दांमध्ये गेली चार वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कार्यकर्ते यांच्याविरुद्ध लिखाण केले आहे. आव्हाड यांच्याविरु द्ध अत्यंत अर्वाच्च भाषेत मेसेजही टाकले आहेत. त्यांच्या पत्नी तसेच मुलीवर बलात्कार करु इथपासून ते तुमचा दाभोळकर करु , असे खुलेआम ट्विटर आणि फेसबुकवर धमक्याही दिल्या आहेत. एकीकडे वैचारीक युद्ध चालू असताना निष्कारण अश्लील भाषेचा वापर करु न वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होतो. दुसरीकडे खून, बलात्कारासारख्या धमक्या दिल्या जातात. मग यांच्याविरु द्ध कार्यकर्त्यांकडून उद्रेक झाला तर निष्कारण त्या कार्यकर्त्यांना दोष दिला जातो. त्यामुळे वेळीच अशा प्रवृत्तींना अटकाव करुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे. या निवेदनासोबत आव्हाड यांना दिलेल्या धमक्या, त्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबीयांसंदर्भात केलेल्या अश्लील टीप्पण्यांचे पुरावे देखिल सादर केले आहेत.

 

Web Title: 'Stop timely targeting of Jitendra Awhad on social media'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.