शिगाव रस्त्यासाठी सेनेचा रास्ता रोको

By Admin | Published: August 21, 2015 11:30 PM2015-08-21T23:30:02+5:302015-08-21T23:30:02+5:30

येथील कामनेश्वर मंदिर ते वंजारपाडा-धनानीनगर-शिगाव व बोईसर ते काटकरपाडा-गणेशनगर-राणी-शिगाव या सुमारे तेरा गावांना व अनेक छोटेमोठे पाडे

Stop the way to the Shigun road | शिगाव रस्त्यासाठी सेनेचा रास्ता रोको

शिगाव रस्त्यासाठी सेनेचा रास्ता रोको

googlenewsNext

बोईसर : येथील कामनेश्वर मंदिर ते वंजारपाडा-धनानीनगर-शिगाव व बोईसर ते काटकरपाडा-गणेशनगर-राणी-शिगाव या सुमारे तेरा गावांना व अनेक छोटेमोठे पाडे व लोकवस्ती असलेल्या भागाला जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुर्दशा यामुळे शुक्रवारी शिवसेनेने रास्ता रोक ो करून प्रशासनाला जाग आणली. सेनेच्या दणक्यानंतर जि.प. उपविभाग (पालघर) च्या उपअभियंत्यांनी रस्त्याची सुरू केलेली डागडुजी व लवकरच करण्यात येणाऱ्या मंजूर कामाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
रस्त्याला पडलेल्या लहानमोठ्या खड्ड्यांमुळे रहदारीच्या या मुख्य रस्त्यावर अपघातांची संख्याही वाढली होती. गारगाव, खानिवडे, शिगाव, हनुमाननगर, खुताड, धनानीनगर, वंजारवाडा, सुतारपाडा, नेवाळे, राणी-शिगाव, मुंडवाळी, गणेशनगर, काटकरपाडा या गावांना जोडणारा हा मुख्य महामार्ग असून या मार्गावरून बोईसर मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्थानक व तारापूर एमआयडीसीच्या दिशेने रहदारी दिवसरात्र सुरू असते. या खड्ड्यांच्या रस्त्यामुळे या मार्गावरील एसटीच्या फेऱ्या बंद होणार की काय, अशी परिस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे पालघर पंचायत समितीचे सदस्य मुकेश पाटील व शिवसेना बोईसर शहरप्रमुख नीलम संखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रास्ता रोकोचा इशारा दिला होता.
आजच्या रास्ता रोको आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ, पं.स.चे सभापती रवींद्र पागधरे, उपसभापती मनोज संखे, पालघर जि.प.चे उपाध्यक्ष सचिन पाटील, पालघर तालुकाप्रमुख सुधीर तामोरे, जि.प. सदस्य चेतन धोडी, माजी सदस्य परशुराम दुमाडा, जगदीश धोडी व मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Stop the way to the Shigun road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.