ठाणे-घोडबंदर रस्त्यावर वाहतूक थांबवून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 12:50 PM2023-07-26T12:50:17+5:302023-07-26T12:53:28+5:30
आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम जोरदार सुरु आहे ,
विशाल हळदे
ठाणे - ठाण्याच्या घोडबंदर रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य, घोडबंदरवरुन ठाण्यात येताना काजू पाड़ा ते गायमुख मधील रस्त्यावर जवळ जवळ 12 ते 14 इंचाचे खडडे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. एकीकडे वाढणारे पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणि खड्ड्यांमुळे होणारे ट्राफिक या ट्राफिकमध्ये खर्च आणि वेळ दोन्हीही जात आहेत.
आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम जोरदार सुरु आहे , ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने येथे ट्राफिक कंट्रोल केली जात आहे . गायमुख घाट सुरु होण्याच्या आगोदर ठाणे ग्रामीण वाहतूक पोलिस विभागाचे कर्मचारी ठाण्यातून येणारी वाहतूक थोडा वेळ रोखून ठेवत आहेत. वर्सोवावरुन येणारे ट्राफिक मोठ्या प्रमाणात आहे म्हणून ही वाहतूक दोन लेंन द्वारे ठाण्याच्या दिशेने सोडण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे.
ठाणे- घोडबंदर रस्त्यावर वाहतूक थांबवून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याचे काम (व्हिडिओ - विशाल हळदे) pic.twitter.com/byqCSnxTYh
— Lokmat (@lokmat) July 26, 2023