‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 05:22 PM2019-08-04T17:22:10+5:302019-08-04T17:24:27+5:30

स्त्री कल्याण संघटनेच्या शालेय वक्तृत्व आणि वाद विवाद स्पर्धा गेली पंचावन्न वर्षे सतत सुरू आहेत.

'Storytelling is the best medium for spreading literature' - Makarand Joshi | ‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशी

‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशी

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशीपरिक्षक म्हणून काम संकलन करणे महत्वाचे असते : किरण बोरकर या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या दिपाली कुर्लेकर

ठाणे : ‘ आज डिजिटल माध्यमांमुळे पुस्तक वाचण्याची सवय कमी होत असताना, कथाकथनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांना पुस्तकांकडे वळवता येऊ शकते. कथा कथनकार हा स्वतः उत्तम वाचक असतो, विविध साहित्यिकांच्या कथा वाचून तो कथनासाठीची कथा निवडतो आणि त्याच्या प्रभावी कथा कथनामुळे श्रोत्यांमधील अनेकांना त्या त्या लेखकाच्या आणखी कथा, इतर साहित्य वाचावेसे वाटते. म्हणूनच कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ असे प्रतिपादन मुक्त पत्रकार आणि लेखक मकरंद जोशी यांनी स्त्री कल्याण संघटनेच्या महिलांसाठी आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्यावेळी केले.

     ठाण्यातील शतकपूर्ती केलेल्या श्री समर्थ सेवक मंड्ळातर्फे महिला आणि मुले ह्यांच्यासाठी काम करणारी स्त्री कल्याण संघटना १९५३ साली स्थापन करण्यात आली होती. गेली पासष्ट वर्षे स्त्री कल्याण संघटना अविरतपणे स्पर्धांपासून ते प्रदर्शनांपर्यंत विविध उपक्रम राबवित आली आहे. सात वर्षांपूर्वी स्त्री कल्याण संघटनेने फक्त महिलांसाठी कथा कथन स्पर्धा आयोजित करायला सुरवात केली. फक्त महिलांसाठी असलेली ही बहुदा महाराष्ट्रातील एकमेव कथा कथन स्पर्धा असावी. यावर्षीच्या स्पर्धेत कोसळणाऱ्या पावसाला न जुमानता विविध वयोगटातील बारा महिलांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे सुपुत्र आणि लेखक किरण बोरकर यांनी परिक्षक म्हणून काम संकलन करणे महत्वाचे असते, स्पर्धेत कथा सादर करताना दिलेल्या वेळेत अपेक्षित परिणाम साधण्यासाठी ते आवश्यक असते’ असे सांगितले. कार्यक्रमाचे पाहुणे मकरंद जोशी यांनी बोलताना ‘ महिला या मुळतच उत्तम कथनकार असतात. श्रावणातल्या कहाण्यांपासून ते अगदी भाजी किती महाग झालेय पर्यंत विविध प्रकारे त्या रंजकपणे, रसाळपणे कथन करत असतात.या स्पर्धेमुळे महिलांच्या या कौशल्याला हक्काचे व्यासपिठ आणि बक्षिसाचे कौतुक लाभले आहे.हा उपक्रम असाच अविरतपणे सुरू रहावा ही आता ठाणेकर रसिकांची जबाबदारी आहे ’ असे उद्गार काढले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या दिपाली कुर्लेकर , द्वितीय क्रमांक पटकावला गंधवती तांबे आणि तृतीय क्रमांक मिळाला निलिमा चाफेकर यांना. यावेळी श्री समर्थ सेवक मंडळाचे शास्ता अनिल हजारे, स्त्री कल्याण संघटनेच्या चिटणीस सरिता कळके आणि संघटनेचे अन्य पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.   

Web Title: 'Storytelling is the best medium for spreading literature' - Makarand Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.