राज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपासून एसटीपास मोफत

By सुरेश लोखंडे | Published: November 9, 2018 07:43 PM2018-11-09T19:43:08+5:302018-11-09T19:50:58+5:30

 यंदाच्या खरीप हंगाम पावसा अभावी घेता आलेला नाही. यामुळे प्राप्त अहवालास अनुसरून महसूल विभागाने राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती घोषीत केली. यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी करून संबंधीत तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचे निश्चित केले. १५ नोव्हेंबरपासून ते १५ एप्रिलपर्यंत ही सवलत राज्यभरातील विद्यार्थ्यांना मिळणार

STP Free for students from 180 drought-hit villages in the state from November 15 | राज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपासून एसटीपास मोफत

राज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास १५ नोव्हेंबरपासून

Next
ठळक मुद्देराज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी १५ नोव्हेंबरपासून ते १५ एप्रिलपर्यंत ही सवलत नव्याने घेण्यात येणाऱ्या पासेस करीता ही मोफत पास सवलत लागू नसणार

ठाणे :महाराष्ट्र  राज्य मार्ग परिवहन (एसटी)महामंडळाने राज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास १५ नोव्हेंबरपासून देण्याचे निश्चित केले. यामध्ये कोकणातील ठाणे जिल्हा वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे.
 यंदाच्या खरीप हंगाम पावसा अभावी घेता आलेला नाही. यामुळे प्राप्त अहवालास अनुसरून महसूल विभागाने राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती घोषीत केली. यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी करून संबंधीत तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचे निश्चित केले. १५ नोव्हेंबरपासून ते १५ एप्रिलपर्यंत ही सवलत राज्यभरातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या सवलतीचा लाभ शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येईल.
या मोफत पासचा लाभ केवळ पास नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या पासेस करीता ही मोफत पास सवलत लागू नसल्याचे एसटी महामंडळाने नमुद केले आहे. या मोफत पास सवलतीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ३३.३३ टक्के रक्कम आता घेतली जाणार नाही. या सवलत १५ एप्रिलपर्यंत सध्यातरी लागू राहणार आहे.मात्र कोकणातील या ठाणे जिल्हा ऐवजी मात्र पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी, विक्रमगड या तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याप्रमाणे विद्यार्थी मोफत पास सवलत लागू झाली. याप्रमाणेच देखील मानगाव, श्रीवर्धन, सुधागड तालुके, तर रन्तागिरीचा मंडणगड आणि सिंधुदुर्गच्या वैभववाडी आणि कोकणातील तालुक्यांतील विद्यार्थ्यांना ही मोफत पास सवलत लागू करण्यात आली आहे.
अन्य तालुक्यांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थितील लागू करावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे. मात्र राजकीय पक्षांकडून त्यास फारसा प्रतिसाद दिसून येत नाही. पावसाच्या अवकृपेसह नुकताच पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. कापून पडलेला भात या अवकाळी पावसाने ओला झाला असून त्यांचे पेंढा देखील वापरण्या लायक नसल्याचे मुरबाड तालुक्यातील तळेगांव येथील आत्माराम देखमुख व पोपटराव देशमुख या शेतकऱ्यानी सांगितले.

Web Title: STP Free for students from 180 drought-hit villages in the state from November 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.