मोखाड्यात पाणी अडवा आणी पैसे जिरवा

By Admin | Published: November 25, 2015 01:33 AM2015-11-25T01:33:16+5:302015-11-25T01:33:16+5:30

आदीवासीची पाण्याची गरज पूर्ण व्हावी, शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, गुरां ढोंराना प्यायला पाणी मिळावे व पाणी अडवा पाणी जिरवा यातून भूजल पातळी वाढावी हे ध्येय डोळ्या समोर ठेवून बंधारे

Strain the water and make money in the market | मोखाड्यात पाणी अडवा आणी पैसे जिरवा

मोखाड्यात पाणी अडवा आणी पैसे जिरवा

googlenewsNext

मोखाडा : आदीवासीची पाण्याची गरज पूर्ण व्हावी, शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, गुरां ढोंराना प्यायला पाणी मिळावे व पाणी अडवा पाणी जिरवा यातून भूजल पातळी वाढावी हे ध्येय डोळ्या समोर ठेवून बंधारे बांधले गेले असले तरी अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळे पाणी अडवा आणि पैसे जिरवा हिच संकल्पना तालुक्यात राबवली गेली असल्याचे चित्र या बंधाऱ्याकडे बघितल्यास दिसून येत आहे
जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने तालुक्यात सन २०१२-१३ ते २०१४-१५ च्या दरम्यान ३ कोटी १९ लाख ६६ हजार रुपये खर्चून तालुक्यातील गावपाड्यात २० बंधारे बांधले आहेत.
परंतु शासनाने या बंधाऱ्यासाठी करोडोंचा खर्च करून देखील मूळ उद्देश साध्य झालेला नाही? यामुळे लघुपाटबंधारे विभागाचा करोडोंचा खर्च पाण्यात गेला असल्याचे दिसते.
याबाबत अधिक माहिती माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता अनेक प्रश्न उपस्थित करून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे यामुळे यांची पाळेमुळे आणखी खोलात असून निकृष्ट कामे करून जनतेचा व शासनाचा पैसा हडप करणारी टोळीच सक्रिय झाली असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे कारण आज घडीला काही मोजके बंधारे सोडले, तर अनेक बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा पाहयला मिळत नाही. निकृष्ट बांधकामामुळे बंधाऱ्यांना गळती लागली आहे. तसेच अनेक बंधारे अपूर्ण आहेत. त्याचबरोबर या विभागाची कामे सुद्धा अंदाजपत्रक नियमावली नुसार केलीच जात नाहीत. दुरुस्तीची कामे ही थातुर मातूरच होतात केवळ लांखोचा खर्च कागदी घोडयावरच नाचवला जातोय.
तर दुसरीकडे मात्र दरवर्षी लाखो रुपयांचे नविन बंधारे मंजूर करून बांधने जात आहेत यामुळे विकास कामाच्या नावाखाली भोंगळ कारभार सुरू आहे
काम सुरु असताना लगतच्या गावपाड्यातील आदीवासी बांधवाची येथे कामाच्या ठिकाणी नेहमीच रहदारी असायची यामुळे हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे? ...याबाबत अनेक तक्रारी येथील आदिवासींनी लोकमत शी बोलतांना सांगितल्या यावरुन या बंधाऱ्यांच्या बांधकामाकडे बघितल्यास लाखोंचा खर्च झाला तरी कुठे असा प्रश्न आहे ? तसेच वन विभागाकडून १० एकर जमीन विकास कामासाठी देण्याची तरतूद असताना काम थांबण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवतोय कुठे? त्याचबरोबर प्रत्यक्षरीत्या कामाच्या ठिकाणाची पाहणी करुन कामाला सुरुवात केली जात असताना, पुन्हा बजेट वाढवण्यासाठी नवीन सुधारीत अंदाजपत्रक का बनवावे लागते किंवा असे असताना याचे शहाणपण अगोदरच का नाही सुचले असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असूून हे काम बंद असल्याने अनेक कारणांची खैरात करणाऱ्या प्रशासनाला विचारले जात आहेत.
तसेच या बंधाऱ्यांवर लाखोंचा खर्च होऊन देखील याचा काहीएक फायदा आदीवासी बांधवाना झाला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात असून याची वरीष्ठ पातळीवरुन चौकशीची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
पेंडकवाडी येथील बंधाऱ्याचे बांधकाम थांबवलेल आहे तसेच हे काम वनविभागच्या जागेत असल्याने मध्यंतरी वन विभागाकडून या कामाबाबत अडकाठी करण्यात आली होती व या कामाचे बजेट मोठे असल्याने याचे नवीन सुधारीत अंदाजपत्रक तयार करून नंतर काम सुरू केले जाईल
- सचिन खंबाईत, उपअभियंता लघुपाटबंधारे विभाग मोखाडा
या बंधाऱ्याचे काम चालू असताना
मी अनेक वेळा या कामाच्या ठिकाणी उपस्थित असायचो जास्तीत जास्त
दगडी गोट्यांचा वापर करून कसे बसे
थातुर माथूर काम करून फक्त या कामाची सुरुवात करून अर्धवट ठेवलेले आहे. यामुळे यांचा आम्हाला काहीच फायदा झालेला नाही तसेच याबाबत आम्ही ग्रामसभेत तक्रार करणार असून यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी
- रामदास बरफ, पेंडकवाडी येथील रहिवासी

Web Title: Strain the water and make money in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.