बदलापूरला फेरीवाले, दुकानदारांमध्ये संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:29 PM2020-09-30T23:29:25+5:302020-09-30T23:29:37+5:30

नव्या विक्रेत्यांची भर : वाहतुकीला अडथळा

Street vendors in Badlapur, struggle among shopkeepers | बदलापूरला फेरीवाले, दुकानदारांमध्ये संघर्ष

बदलापूरला फेरीवाले, दुकानदारांमध्ये संघर्ष

Next

बदलापूर : लॉकडाऊनकाळात नागरिकांना सुविधा व्हावी, या उद्देशाने बदलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, अनलॉक सुरू झाल्यानंतरही बाजारपेठ परिसरातील फेरीवाले जागा सोडायला तयार नाहीत. त्यावरून आता व्यापारी व फेरीवाले असा संघर्ष होऊ लागल्याचे चित्र बदलापूरमध्ये दिसू लागले आहे.

बदलापूरच्या पश्चिम भागात मुख्य बाजारपेठ असून येथे भाजीमंडईही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय फळ व भाजीविक्रेत्यांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून शहरातील मोकळे रस्ते आणि चौकात बसण्याची मुभा दिली होती. लॉकडाऊनकाळात अनेक नव्या भाजी, फळविक्रेत्यांची यात भर पडली. त्यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना त्रास होत असून स्वत:च्या दुकानात व्यवसाय करणे कठीण झाले आहे, अशी भावना व्यापारी व्यक्त करतात.  गेल्या आठवड्यात एका फेरीवाल्याला हटकले असता त्याने थेट दुकानदारावर धावत जाऊन शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यामुळे अशा हेकेखोर आणि मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील आदिवासी, शेतकरी यापूर्वीही व्यवसाय करत होते. मात्र त्यांनी दुकानदारांना कधी त्रास दिला नव्हता. आता मात्र फेरीवाले शिरजोर होऊ लागले असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आम्ही कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासकांना केली असल्याचे बाजारपेठ व्यापारी जनसेवा मित्र मंडळाचे सचिव श्रीराम चुंबळे यांनी सांगितले.

आता अनलॉक सुरू झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे स्थानक, बाजारपेठ परिसरात गजबज वाढली आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर बसलेले फेरीवालेही तिथेच आहेत. काही फेरीवाल्यांच्या पूर्वी एक ते दोन असलेल्या टोपल्या आता सात ते आठच्यावर गेल्या आहेत.

Web Title: Street vendors in Badlapur, struggle among shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.