शहरातील रस्त्यांची सफाई होणार आता मशिनच्या सहाय्याने; महापालिका आयुक्तांनी दिले आदेश
By अजित मांडके | Published: January 18, 2023 04:03 PM2023-01-18T16:03:56+5:302023-01-18T16:05:54+5:30
शहरामध्ये सद्यस्थिती मॅन्युअल स्विपींग सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरामध्ये सद्यस्थिती मॅन्युअल स्विपींग सुरू आहे. मॅन्युअल स्विपींगचा दर्जा वाढविण्यासाठी एका बाजूला जेव्हा प्रयत्न केले जातात त्याचवेळी शहरातील मोठ्या काँक्रि टच्या रस्त्यावर मशीनच्या सहाय्याने साफसफाई सुरू केली, तर हे रस्ते स्वच्छ ठेवण्यामध्ये अधिक मदत होईल. जगभरातील सर्व आधुनिक शहरांमध्ये अशा पध्दतीच्या मशिनचाच्या मोठय़ा प्रमाणावर साफसफाई केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर केली जाते त्यानुसार अशा प्रकारची मशिनची खरेदी करण्याच्या सुचना आयुक्त अभिजित बांगर यांनी संबधींत विभागाला दिल्या.
ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या सिमेंट रस्त्यांची तसेच मोठय़ा रस्त्यांची सफाई ही कामगारांच्या माध्यमातून म्हणजेच मॅन्युअल पध्दतीने केली जात आहे. तसेच या कामी खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून मनुष्यबळही घेण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून ही सफाई होत असल्याचे दिसत आहे. परंतु आता मॅन्युअल स्विपींगचा दर्जा वाढविण्यासाठी आणि रस्त्यांची सफाई देखील उत्तम प्रकारे करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी महत्वाची पावले उचलली आहेत. त्यानुसार आता शहरातील रस्त्यांची सफाई आता मशिनच्या माध्यमातून करण्यासाठीचे आदेश त्यांनी दिले आहेत.
सध्या ज्या स्मशानभूमीमध्ये गॅस किंवा इलेक्ट्रीक शवदाहिनी उपलब्ध करु न देण्यात आली आहेत, अशा स्मशानभूमीमध्ये नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ठाणो शहराने भविष्यामध्ये पर्यावरणपूरक उपक्र मांच्या आधारे पर्यावरण संवर्धनाकडे वाटचाल करणो आवश्यक आहे, या प्रयत्नाचा एक भाग म्हणून स्वच्छ वायू कृती आराखडयाअंतर्गत सर्व स्मशानभूमींमध्ये इलेक्ट्रीक आणि गॅस शवदाहिनीची उपलब्धतता करु न द्यावी असा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करु न देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या.
तसेच यापूर्वी अनुदानातून माजिवडा व विटावा नाका येथे मिस्ट फाऊंटनची उभारणी, वर्तकनगर येथे सायकल मार्गिका, आनंदनगर ईवा स्कूल येथे वृक्ष लागवड, अद्ययावत फिरती प्रयोगशाळा व लोकमान्यनगर येथील स्मशानभूमीमध्ये गॅस शववाहिनी बसविण्याच्या कामासाठी खर्च करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"