ठामपात २२१ महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त

By admin | Published: October 29, 2015 11:31 PM2015-10-29T23:31:26+5:302015-10-29T23:31:26+5:30

ठाणे महापालिकेत आरक्षित जागेवर महिला कर्मचारी आणि अधिकारी यांची वानवा आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग शासन निर्णयानुसार महिलांकरिता असलेल्या

The strength of 221 female employees, officers vacancies remained vacant | ठामपात २२१ महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त

ठामपात २२१ महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त

Next

घोडबंदर : ठाणे महापालिकेत आरक्षित जागेवर महिला कर्मचारी आणि अधिकारी यांची वानवा आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग शासन निर्णयानुसार महिलांकरिता असलेल्या ३० टक्के आरक्षित जागांवर भरती करण्यात येत असते. महापालिकेत विविध खात्यांसाठी निघालेल्या भरतीमध्ये २२१ पदांसाठी महिला कर्मचारी मिळू शकले नाहीत. यामध्ये कनिष्ठ अभियंता १४ जागा, सार्वजनिक बांधकाम खाते १३०, बिगारीपदासाठी, मिश्रक लिपीक ३, ट्रेसर ३, सिनिअर आणि ज्युनिअर टेक्निशियनच्या १७ जागांवर महिला कर्मचारी मिळालेले नाहीत. ही माहिती पाहणी दौऱ्यावर आलेल्या शासनाच्या विधिमंडळ महिला समितीला दिली.
मागील तीन वर्षांत महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर भरती करण्यात आली होती. २०१२ मध्ये भूमापकपदाच्या महिलांसाठी ९ जागा होत्या. त्यापैकी ६ पदे भरलीत. २०१३ मध्ये पाणी खाते १२ जागा, वायरमन ४, टूल्समनच्या २९ जागांसाठी महिला उमेदवार मिळालेले नाहीत. तर, बिगारी पाणी खाते १४, परिचारिका १३, प्रसविका १५ भरतीसाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती या समितीला दिलेली आहे. (वार्ताहर)

Web Title: The strength of 221 female employees, officers vacancies remained vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.