ठामपा करणार आरोग्य विभागाचे बळकटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 02:06 AM2021-02-07T02:06:21+5:302021-02-07T02:06:39+5:30
अर्थसंकल्पात केली भरीव तरतूद; नवीन कोणतीही कामे प्रस्तावित नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी सादर केलेल्या २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रकात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह इतर महापालिका रुग्णालयांमध्ये उपकरणे खरेदी करणे, औषधोपचार उपलब्ध करून देणे, तसेच सध्याच्या घडीला विविध रुग्णालयांची सुरू असलेल्या कामांसाठी पुरेसा प्रमाणात निधीची उपलब्ध करून दिला आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक स्थिती खालावली असल्याने सध्यातरी कोणत्याही नवीन प्रस्तावित कामांसाठी निधी दिला नसला तरी भविष्यात आर्थिक स्थिती सुधारताच आरोग्याच्या नव्या प्रस्तावित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ठाणे महापालिकेचे २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्थायी समितीकडे सादर केले. मात्र, मागील आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम तिजोरीवरदेखील झाला आहे.
कोरोनाच्या महाभयंकर पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेचे लक्तरे चव्हाट्यावर आली होते. त्यामुळे कोविडकाळात शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून व महापालिका निधीतून आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरण केले. असे असले तरी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी काय? असा सवाल केला जात होता. त्यानुसार आरोग्य सुविधा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच इतर रुग्णालयांमधील उपकरणे आणि इतर कामांसाठी २७ कोटी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे येत्या काही काळात ही रुग्णालये सक्षम होणार आहेत. त्याचा लाभ रुग्णांना होईल.
२५६.८४ कोटींची खर्चाची तरतूद
ठाणे महापालिकेने ही तरतूद केली असली तरी आरोग्यव्यवस्था बळकट करण्यासाठी आयुक्तांनी २५६.८४ कोटींची खर्चाची तरतूद प्रस्तावित केली आहे. कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था किती महत्त्वाची असते याची जाणीव आता प्रशासनाने झाली आहे. त्यामुळे भविष्यात असे संकट उभे राहिले तर त्याचा सामना करण्यासाठी आतापासूनच सुरुवात केली आहे.
nयामध्ये पूर्वी प्रस्तावित केलेल्या कामांव्यतिरिक्त नव्या कोणत्याही कामांचा समावेश नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.