अदानी औष्णिक वीज केंद्रात कंत्राटी कामगारांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 06:24 AM2021-01-09T06:24:00+5:302021-01-09T06:24:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या (एईएमएल) डहाणू येथील औष्णिक ऊर्जा केंद्रात काम करणाऱ्या शेकडो कंत्राटी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या (एईएमएल) डहाणू येथील औष्णिक ऊर्जा केंद्रात काम करणाऱ्या शेकडो कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी, ८ जानेवारी रोजी संप पुकारला. दरम्यान, हा संप बेकायदेशीर, विनाकारण व अनावश्यक असल्याचा खुलासा या ऊर्जा केंद्राकडून प्रसिद्धिपत्राद्वारे करण्यात आला आहे.
या संपकाळात प्लांटचे कामकाज सुरळीत सुरू राहावे व मुंबईला २४ तास वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लालबावटा ठाणे जिल्हा कामगार संघटनेने पुकारलेला हा संप दुर्दैवी असून सुरळीत असलेले औद्योगिक संबंध बिघडवण्याच्या उद्देशाने पुकारला असल्याची पुष्टीही जोडली आहे. वेतन करारासंदर्भात बोलणी सुरू असून, सध्याच्या
वेतन कराराप्रमाणे कामगारांना
वेळोवेळी पगारवाढ देण्यात आली आहे.
एईएमएल व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी पूर्णपणे काळजी घेतली आहे. या कामगारांना महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनापेक्षा अधिकचे वेतन दिले जाते. याशिवाय भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, निवृत्तिवेतन आणि वैद्यकीय साह्य आदी सुविधा दिल्या जातात. तसेच याशिवाय गणवेश व सुरक्षा उपकरणे आदीही पुरवले
जात असल्याचे अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या प्रवक्त्याने प्रसिद्धिपत्राद्वारे माहिती दिली.