स्वत:ची चूक ग्राहकांच्या माथी मारण्याचा ठामपाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 09:48 PM2017-09-28T21:48:19+5:302017-09-28T21:48:33+5:30

पाण्याची बिले वेळत न दिल्याने ठाणेकरांनी ती वेळत भरता आलेली नाहीत. परंतु पालिकेने केलेली ही चुक ग्राहकांच्या माथ्यावर टाकण्याचा घाट घातला असल्याची माहिती समोर आली आहे. एकतर पाण्याची देयके वेळेवर दिली नाहीत आणि अशा बिलांवर व्याजाची आकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Strong attempts to get rid of their own mistakes | स्वत:ची चूक ग्राहकांच्या माथी मारण्याचा ठामपाचा प्रयत्न

स्वत:ची चूक ग्राहकांच्या माथी मारण्याचा ठामपाचा प्रयत्न

Next

ठाणे - पाण्याची बिले वेळत न दिल्याने ठाणेकरांनी ती वेळत भरता आलेली नाहीत. परंतु पालिकेने केलेली ही चुक ग्राहकांच्या माथ्यावर टाकण्याचा घाट घातला असल्याची माहिती समोर आली आहे. एकतर पाण्याची देयके वेळेवर दिली नाहीत आणि अशा बिलांवर व्याजाची आकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार अनेकांना तशी बिले देखील गेली आहेत. त्यामुळे पालिकेच्या विरोधात आता संतापाची लाट उसळली आहे.

ठाणो महापालिकेने घरांच्या क्षेत्रफळांनुसार जागेची आकारणी करण्याअगोदर पालिका इमारतींमधील घरांसाठी प्रती  घर 180 रु पये प्रती महिना आणि झोपडपटटी अथवा चाळींतील घरासाठी 100 रु पये प्रती महिना पाणीपटटी आकारत होती. मात्र त्यामुळे पाणीखात्याला सुमारे 50 ते 55 कोटी रु पयांचा वार्षिक तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे घराच्या क्षेत्रफळानुसार पाणीपटटी आकारण्याची शक्कल लढविण्यात आली. त्यानुसार 500 चौरस फुटांच्या घरांना 180 वरु न 210 रु पये प्रती महिना वाढविण्यात आले. मात्न त्यासाठी घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले नाही.

         समता नगरचे रहिवासी असलेले मिलिंद गायकवाड म्हणाले की, पाणीपटटीची मागील वर्षीची आणि या वर्षीची  बीले 22 सप्टेंबरच्या सुमारास आमच्या हातात पडली. बीले भरण्यास आमचा आक्षेप नाही, पण जर पालिकेनेच मागील वर्षीची बिले उशिरा पाठविली आहेत तर त्यावर विलंब आकार किंवा व्याज आम्ही का भरायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गायकवाड ज्या सोसायटीमध्ये राहतात त्या सोसायटीला विलंब आकार म्हणून तब्बल 10 हजार रु पये भरण्यास सांगण्यात आले आहे. पालिकेचे कर निर्धारक ओमप्रकाश दिवटे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी विलंब आकाराबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आल्याचे कबूल केले. बिलावरील व्याज किंवा विलंब आकार माफ करण्याचा विचार आहे. मात्र अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही, असे ते म्हणाले. नागरिकांनी त्यांची बिले भरावीत. त्यांनी भरलेली वाढीव रक्कम पुढील बिलात समायोजन करु असेही त्यांनी स्पष्ट केले. नविन दराप्रमाणो पाणीपटटी आकारण्याचा निर्णय 2015 मध्ये  झाला. या संबधीचा ठराव मंजुर झाला तोपर्यंत पाण्याची संगणकीय बिले जुन्या दराप्रमाणोच तयार झाली होती. एवढया मोठया प्रमाणावर छापून झालेल्या बिलांमध्ये दुरु स्ती शक्य नव्हती. त्यामुळे यंदाची नविन दरांची बिले देताना मागील वर्षीची थकबाकी देखील अंतर्भूत करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Strong attempts to get rid of their own mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.