शिवसेनेचा प्रखर विरोध करणारे आज गोडवे गात आहे; आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

By अजित मांडके | Published: February 28, 2024 08:39 PM2024-02-28T20:39:05+5:302024-02-28T20:39:46+5:30

आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय असा सवाल देखील परांजपे यांनी उपस्थित केला. 

strong opponent of shiv sena is supporting today anand paranjape criticism of jitendra awhad | शिवसेनेचा प्रखर विरोध करणारे आज गोडवे गात आहे; आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

शिवसेनेचा प्रखर विरोध करणारे आज गोडवे गात आहे; आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

अजित मांडके,  लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध करणारे आज त्यांचे गोडवे गट आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. तसेच शरद पवार साहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की तो साहेबांचा आशिर्वाद पण अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली की ती गद्दारी? त्यामुळे आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय असा सवाल देखील परांजपे यांनी उपस्थित केला. 

विधिमंडळात प्रतिक्रिया देताना, शरद पवार यांच्याशी आम्ही गद्दारी केली. आम्ही त्यांचा पक्ष हिसकावून घेतला, चिन्ह हिसकावून घेतले, कार्यालय देखील आम्ही घुसून ताब्यात घेणार आहते, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्याचा खरपूस निरोप राष्ट्रवादी (अजित पवार) गत्चे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी घेतला.  शरद पवार यांच्या आशीर्वादाने, सहमतीने २०१४ साली विधानसभा निवडणुकीची आकडेवारी येत असताना आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता. याला काय म्हणायचे ? २०१६ साली, २०१८ साली, २०१९ साली अनेक बैठका भाजपच्या शिर्ष नेत्यांबरोबर झालेल्या आहेत. साहेबांच्या सहमतीने व आशिर्वादाने या बैठका झाल्या होत्या याला काय म्हणायचे ? ज्या जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः सामना पेपर जाळला, शिवसेनेविरूद्ध आंदोलने केली, त्याच शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेत २०१९ मध्ये सामील झाले. मग याला काय म्हणायचे? पवारसाहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की, तो साहेबांचा आशिर्वाद पण एक वेगळी राजकीय भूमिका अजित पवार यांनी घेतली की ती गद्दारी ? जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय ? याचे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करावे, अशी प्रश्नांची सरबत्ती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे.

कळव्याची शिवसेनेची शाखा असेल, खारीगाव ची शिवसेनेची शाखा असेल, या शाखा कोणामुळे तुटल्या? हे बहुतेक जितेंद्र आव्हाड विसरले असतील. ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध जितेंद्र आव्हाड यांनी केला त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. निवडणूक आयोगासमोर दोनतीन महिने सुनावणी झाली त्याच्यानंतर पक्ष व चिन्ह याचा निर्णय आमच्या बाजूने मिळाला, लोकशाही मार्गाने केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष दिला, चिन्ह दिले. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आमच्या बाजुने निर्णय दिला. तसेच आमच्यामध्ये तुमचे कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नसल्याचे देखील परांजपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: strong opponent of shiv sena is supporting today anand paranjape criticism of jitendra awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.