पालिका शाळा खाजगीकरणाला तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:52 AM2020-02-18T00:52:54+5:302020-02-18T00:53:00+5:30
उल्हासनगरमध्ये भाजपचा डाव उधळला : मनसेचे विरोधी पक्षनेत्याला निवेदन
उल्हासनगर : महापालिका शाळा खाजगीकरण प्रस्तावाला मनसेने विरोध करत महासभेत प्रस्ताव आणणारे विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, मनोज लासी यांना निवेदन दिले. तसेच हा प्रस्ताव मागे घेण्याचे सुचविले आहे. शाळांना डिजिटल करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. शिवसेना, राष्टÑवादी, काँगे्रस, भारिप व पीआरपी आदी पक्षांनी शाळा खाजगीकरण प्रस्तावाला विरोध केल्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे.
उल्हासनगर महापालिका शाळा शैक्षणिक संस्थांना चालवण्यासाठी देण्याचा प्रस्ताव सूचक सूचनेद्वारे भाजप नगरसेविका मीना सोंडे, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, प्रदीप रामचंदानी व मनोज लासी यांनी आणले होते. ‘लोकमत’मध्ये ‘पालिका शाळेची वाटचाल खाजगीकरणाकडे’ अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. याबाबत शहरातून टीकाही झाली. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज शेलार, शहर संघटक मैन्नुद्दीन शेख आदी कार्यकर्त्यांनी दुपारी १ वाजता महापालिका विरोधी पक्षनेत्यांचे कार्यालय गाठून त्यांना शाळा खाजगीकरणाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली. तसेच प्र्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या नगरसेवकांविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. मनसेच्या या इशाºयानंतर भाजपने प्रस्ताव मागे घेण्याची संमती दर्शवली आहे.
महापालिका शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमांच्या २२ शाळा आहेत. गोरगरिबांची पाच हजारांपेक्षा जास्त मुले येथे शिक्षण घेत आहेत. शाळेच्या इमारती ६० वर्षे जुन्या असून दुरवस्था झालेली आहे.
उपमहापौरांशी शाब्दिक चकमक
मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह पक्षाचे शिष्टमंडळ निवेदन देताना मनसे कार्यकर्ते आणि उपमहापौर भगवान भालेराव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.