महागाई विरोधातील कॅटच्या देशव्यापी बंदमधील सहभागासाठी ठाण्यासह राज्यातील व्यापाऱ्यांची जोरदार तयारी   

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 02:58 PM2021-02-12T14:58:43+5:302021-02-12T14:59:18+5:30

inflation News : यंदाच्या अर्थसंकल्पात वस्तू सेवा कर संदर्भात केलेल्या जाचक अटी व तरतुदी विरोधात व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Strong preparation of traders in the state including Thane for participation in CAT's nationwide shutdown against inflation | महागाई विरोधातील कॅटच्या देशव्यापी बंदमधील सहभागासाठी ठाण्यासह राज्यातील व्यापाऱ्यांची जोरदार तयारी   

महागाई विरोधातील कॅटच्या देशव्यापी बंदमधील सहभागासाठी ठाण्यासह राज्यातील व्यापाऱ्यांची जोरदार तयारी   

Next

ठाणे  - यंदाच्या अर्थसंकल्पात वस्तू सेवा कर संदर्भात केलेल्या जाचक अटी व तरतुदी विरोधात व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्याविरोधात देशातील सुमारे ४० हजाराहून अधिक विविध व्यापारी संघटनांनी कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २६ फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा केली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ठाणे,मुंबईसह आपल्या राज्यातील व्यापारी तयारीला लागले आहे, असे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी लोकमतला सांगितले. सांगितले.

केंद्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात जाचक व मनमानपणे वस्तू सेवा कर घोषित केलेला . त्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांवर हा अन्याय आहे. तो तत्काळ दूर करण्यासाठी  कँटने भारत बंदचे घोषीत केले आहे. त्यात मुंबई, ठाणेसह राज्यभरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचे ठक्कर यांनी सांगितले.हा बंद यशस्वी करण्यासाठी कँटचे पदाधिकारी, कार्यकर्ते युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. यासाठी निरनिराळ्या राज्यातील कॅटच्या राष्ट्रीय नेत्यांनी अनेक राज्यात दौरे सुरु केले असल्याचे ठक्कर यांनी सांगितले.

या बंदसाठी कर सल्लागार, सनदी लेखापाल, विविध आस्थपनाचे सचिव, लघुउद्योग, पेट्रोल पंप, थेट विक्री केंद्र, फेरीवाले, चित्रपटाशी संबंधित उद्योग महिला संघटनांच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांशी संपर्क साधून त्यांचा भारत बंदला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याशिवाय ऑनलाईन विक्रेते, व्यापार संबधित निरनिराळ्या संघटनांनाही भारत बंद मध्ये सहभागी करण्यासाठी कॅटचे सरचिटणीस प्रविण खंडेलवाल प्रयत्न करीत असल्याचे वास्तव ठक्कर यांनी स्पष्ट केले आहे.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांच्याकडे  दिल्ली आणि उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण खंडेलवाल महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान आणि अंदमान निकोबार या राज्यांचा दौरा करणार आहेत. कॅटचे राष्ट्रीय  चेअरमेन महेंद्र शाह आणि उपाध्यक्ष घनश्याम भाटी हे दक्षिणेतील राज्यांना भेट देऊन भारत बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर कॅटचे राष्ट्रीय उप कार्याध्यक्ष ब्रिजमोहन अग्रवाल हे ओरिसा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड या राज्यात जाणार आहेत. कॅटचे राष्ट्रीय चिटणीस सुमित अग्रवाल यांच्याकडे पंजाब, हरियाणा आणि चंदीगड तर राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याकडे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दुसरे उपाध्यक्ष नीरज आनंद यांच्याकडे जम्मू काश्मीर आणि लेह लडाखची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  हे सर्व पदाधिकारी १४ ते २३ फेब्रुवारीदरम्यान संबंधित राज्यांना भेटी देऊन भारत बंदला प्रतिसाद मिळवण्यासाठी जनसामान्यांत वस्तू सेवा करातील जाचक अटींविषयी जागृती करीत आहे. 

या बंदसाठी कर सल्लागार, सनदी लेखापाल, विविध आस्थपनाचे सचिव, लघुउद्योग, पेट्रोल पंप, थेट विक्री केंद्र, फेरीवाले, चित्रपटाशी संबंधित उद्योग महिला संघटनांच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांशी संपर्क साधून त्यांचा भारत बंदला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याशिवाय ऑनलाईन विक्रेते, व्यापार संबधित निरनिराळ्या संघटनांनाही भारत बंद मध्ये सहभागी करण्यासाठी कॅटचे सरचिटणीस प्रविण खंडेलवाल प्रयत्न करीत असल्याचे वास्तव ठक्कर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Strong preparation of traders in the state including Thane for participation in CAT's nationwide shutdown against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.