अभ्यासाच्या तणावातून  विद्यार्थ्याची आत्महत्या, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 01:14 PM2021-11-23T13:14:18+5:302021-11-23T13:14:43+5:30

वागळे इस्टेट, रामचंद्रनगर, वैतीवाडी येथील एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर तो वास्तव्याला होता. तो बंगळुरू येथे वैद्यकीय विभागामध्ये फिजिओथेरपीच्या प्रथम वर्ष वर्गात शिकत होता.

Student commits suicide due to study stress | अभ्यासाच्या तणावातून  विद्यार्थ्याची आत्महत्या, गुन्हा दाखल

अभ्यासाच्या तणावातून  विद्यार्थ्याची आत्महत्या, गुन्हा दाखल

Next

ठाणे : अभ्यासाच्या तणावातून राहुल समीर दळवी (१९) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सोमवारी पोलिसांनी दिली. 

वागळे इस्टेट, रामचंद्रनगर, वैतीवाडी येथील एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर तो वास्तव्याला होता. तो बंगळुरू येथे वैद्यकीय विभागामध्ये फिजिओथेरपीच्या प्रथम वर्ष वर्गात शिकत होता. अलीकडेच १८ नोव्हेंबर रोजी तो ठाण्यात परतला होता. ठाण्यात तो आईवडील आणि आजीसह वास्तव्य करीत होता. रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरात आई आणि आजी असताना बेडरूममध्ये त्याने गळफास घेतल्याचे आढळले. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याचे वडील समीर दळवी यांनी तातडीने ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तेथील डॉक्टरांनी तो मृत पावल्याचे घोषित केले. प्राथमिक तपासात तरी अभ्यासाच्या ताणातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि निरीक्षक विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे हे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अभ्यासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे उघड झाले आहे. 
 

 

Web Title: Student commits suicide due to study stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.