महापालिका शाळांमध्ये उत्तम वातावरण असेल तर विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त करू शकतात : आ. केळकर

By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 5, 2024 03:05 PM2024-03-05T15:05:49+5:302024-03-05T15:06:07+5:30

२० महापालिका शाळांना आमदार निधीतून दिले प्रोजेक्टर

Students can achieve quality if municipal schools have a good environment: a. Kelkar | महापालिका शाळांमध्ये उत्तम वातावरण असेल तर विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त करू शकतात : आ. केळकर

महापालिका शाळांमध्ये उत्तम वातावरण असेल तर विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त करू शकतात : आ. केळकर

ठाणे : महापालिका शाळांमध्ये उत्तम वातावरण, उत्तम परिसर, उत्तम साहित्य उपलब्ध असेल तर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुणवत्ता प्राप्त करू शकतात असे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. ठाणे महापालिकेच्या सर्व शाळा डिजिटल व्हाव्यात या उद्देशाने केळकर यांनी त्यांच्या आमदार निधीतून मंगळवारी त्यांच्या हस्ते त्यांच्या मतदार संघातील २० ठाणे महापालिका शाळांना प्रोजेक्टर देऊन अद्यावत प्रणालीची दारे खली करून दिली आहेत. 

डिजिटल महापालिका शाळा या उपक्रमांतर्गतठाणें १४८ विधानसभा क्षेत्रातील महापालिकेच्या सर्व शाळा आपल्या आमदार निधीतून डिजिटल करून गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून २० शाळांना प्रोजेक्टरचे वाटप करण्यात आले. 

आ. केळकर पुढे म्हणाले की, पूर्ण मतदार संघातील शाळा डिजिटल झाल्या पाहिजे हा संकल्प आम्ही केला होता. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी उपलब्ध झाले पाहिजे, जग जवळ आले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत..ज्या अनुदानित शाळा आहे त्यांना आणि महापालिका शाळा २० शाळा त्यांना अशा शाळांना डिजिटल करण्यासाठी जे लागेल ते द्यायचे असे ठरविले. खरंतर सर्व ठिकाणी शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत मग तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग. तसेच, कोणत्याही माध्यमाची शाळा असो त्यांना अद्यावत प्रणाली उपलब्ध झाली पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांशी संवाद करताना त्यांना कोणत्या गोष्टी हव्यात, कोणत्या गोष्टी चुकीच्या हे सांगता येते. विद्यार्थी हित हे महत्त्वाचे आहे कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत त्यामुळे त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे.

ठाणे महापालिका शाळांच्या अनेक समस्या आहेत आपण आपल्या माध्यमातून शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निदर्शनास आणले. कोकण पदवीधर संघाचे माजी आमदार ऍड. निरंजन डावखरे म्हणाले की, आपण तंत्रज्ञानाच्या एका टप्प्यावर जात आहोत त्यामुळे एका क्लिकवर विद्यार्थ्यांना जगाचे ज्ञान उपलब्ध व्हावे त्यासाठी आमदार केळकर यांनी हाती घेतलेला घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ठाण्याची मुलं कुठे मागे पडणार नाही याची खात्री आहे. यावेळी ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक सुनेश जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी,  मृणाल पेंडसे नम्रता कोळी, हाउसिंग फेडरेशनचे सिताराम राणे, मुकेश मोकाशी, विकास पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: Students can achieve quality if municipal schools have a good environment: a. Kelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.