अरे देवा ! रेल्वेचे तिकीट नाही मिळालं; वाहतुकी कोंडीमुळे हुकली विद्यार्थ्यांची  परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 05:45 PM2021-08-26T17:45:21+5:302021-08-26T17:46:00+5:30

मोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे आणि रेल्वेचं तिकिट न मिळाल्यानं विद्यार्थ्यांची मेहनत गेली वाया.

students did not get train ticket stuck in traffic jam missed their exams | अरे देवा ! रेल्वेचे तिकीट नाही मिळालं; वाहतुकी कोंडीमुळे हुकली विद्यार्थ्यांची  परीक्षा

अरे देवा ! रेल्वेचे तिकीट नाही मिळालं; वाहतुकी कोंडीमुळे हुकली विद्यार्थ्यांची  परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे आणि रेल्वेचं तिकिट न मिळाल्यानं विद्यार्थ्यांची मेहनत गेली वाया.

मयुरी चव्हाण 

खड्डयांमुळे आजवर अनेक अपघात झालेले आपण ऐकले आहेत. इतकंच नाही तर लोकलसेवेच्या प्रवासासाठी मर्यादा असल्याने कामावरही लेटमार्क लागल्याचे प्रकार समोर आले. मात्र वाहतूक कोंडी आणि खड्डे आणि एकंदरीतच खराब रस्त्यांमुळे कल्याण- डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परीसरातील सुमारे 10 ते 15 विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहचले. परिणामी, या विद्यार्थ्यांना  परीक्षेला मुकावे लागले आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून केलेली मेहनत वाया गेली अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिल्या आहेत. 

एमआयडीसी विभागाच्या असिस्टंट पदासाठी शनिवारी ठाणे येथील घोडबंदर परिसरातील नियोजित परीक्षा केंद्रावर संध्याकाळी ५ वाजता परीक्षा होणार होती. मात्र शनिवारी, एकीकडे पाऊस, खड्डे, खराब रस्ते आणि ट्रॅफिक जाम यामुळे काही विद्यार्थी उशिरा परीक्षा केंद्रांवर पोहोचले. परिणामी, विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास मुकावे लागले आहे. या प्रकारामुळे परीक्षेसाठी केलेली सर्व मेहनत वाया गेली अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. शहापूर ,मुरबाड, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ व ग्रामीण भागातील  बहुतांश विद्यार्थी अभ्यास करूनही परीक्षा देऊ न शकल्याने खंत व्यक्त केली. तर काही विद्यार्थी ठाणे शहरात पोहोचले खरे मात्र वाहतूक कोंडी इतकी होती की परीक्षा केंद्रावर पोहचेपर्यंत तब्बल तीन तासांचा कालावधी लागला अस विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

परीक्षा पुन्हा घेऊन, एक संधी पुन्हा द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. कोरोनाचा कालावधी असल्याने तिकीट मिळत नव्हते. त्यामुळे रस्ता हाच एकमेव पर्याय होता. अशा स्थितीत, ओला, रिक्षा, टॅक्सीचा आधार घेत प्रवास करावा लागतो. मात्र, सतत पडणारा पाऊस, रस्त्यांची सुरू असलेली कामं, खड्डे, खराब रस्ते व वाहतूक कोंडीमुळे वेळेआधी निघूनही परीक्षा केंद्रावर  जाण्यास उशिर झाला असेही या निवेदनात म्हटले आहे. हे  निवेदन परीक्षा केंद्रावर जमा केल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं. मात्र असं कोणतेही निवेदन प्राप्त झाले नसल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले आहे. तर यासंदर्भात मंत्रालयात दाद मागितली जाईल असे परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या सुरेखा केदार यांनी सांगितले. 

एमआयडीसी प्रशासन काय म्हणाले ? 
काही परीक्षार्थी पाच वाजून गेल्यावर आले ही वस्तुस्थिती खरी आहे. परीक्षेची वेळ पाच वाजता होती. त्यासाठी साडेतीन वाजल्यापासून प्रवेश दिला जाणार होता.साडेचार वाजता गेट बंद करण्यात येईल अस स्पष्ट करण्यात आलं होतं. परीक्षा सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटं अगोदर जे विद्यार्थी आले त्यांना सुद्धा प्रवेश देण्यात आला. मात्र परीक्षा सुरू झाल्यानंतर  जे विद्यार्थी आले त्यांना प्रवेश दिला गेला नाही असे ठाणे एमआयडीसीचे  विभागीय अधिकारी विजयसिंग पाटील यांनी सांगितले. तसेच आवश्यक प्रक्रिया कम्प्युटर बेस असल्यामुळे लॉग इन व इतर गोष्टी दिल्यानंतर कोणालाही प्रवेश दिला गेला नसल्याचही पाटील म्हणाले. यासंदर्भात कोणतेही निवेदन अद्याप आपल्यापर्यंत आले नाही मात्र हा सर्व विषय माहित असल्याचेही त्यांनी मान्य केलं.  

कल्याणमध्ये गौरीपाडा परीसरात मी राहते. कल्याणपासूनच मला खूप ट्रॅफिक लागला. जवळपास अर्धा तास चालत मी स्टेशनपर्यंत पोहचले. वाहतूक कोंडी झाल्याने दोनदा आम्हाला बस मधून उतरावं लागलं.
मयुरी बोटे ,कल्याण. 

मी कळव्याला राहतो. परीक्षेची वेळ पाच वाजताची होती. चार वाजता परीक्षा केंद्रावर पोहचणे अपेक्षित होते. मात्र कळवा नाक्यापासूनच ट्रॅफिक लागला. एरवी कळव्याहून ठाणे शहरात जायला 20 मिनिटं लागतात. मात्र शनिवारी 5 वाजून गेले तरी केंद्रावर पोहचणे शक्य झाले नाही. 
राकेश शिंदे,  कळवा.

Web Title: students did not get train ticket stuck in traffic jam missed their exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.