ठाण्यातील दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी विशेष मुलांच्या जलतरण स्पर्धेत मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 03:50 PM2018-07-17T15:50:11+5:302018-07-17T15:52:55+5:30

कळव्यातील मनीषा नगर येथे जलतरण स्पर्धा घेण्यात आली. त्यात दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. 

Students of Divyang Kala Kendra, Thane, have won special children's swimming competition |  ठाण्यातील दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी विशेष मुलांच्या जलतरण स्पर्धेत मारली बाजी

 ठाण्यातील दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी विशेष मुलांच्या जलतरण स्पर्धेत मारली बाजी

Next
ठळक मुद्देदिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजीअन्मय मेत्री प्रथम तर पार्थ खडकबाण तृतीय विशेष मुलांचा वाढलेला आत्मविश्वास, त्यांच्यातील बदल हेच आमचे यश - किरण नाकती

ठाणे : ठाण्याच्या आदित्य प्रतिष्ठान संचालित दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी, "यशवंत रामा साळवी" स्विमिंग क्लब स्पर्धेत पारितोषिक पटकावत सगळ्यांची मने जिंकली. अन्मय मेत्री याने एक मिनिट अकरा सेकंद मध्ये पन्नास मीटर अंतर पार करत प्रथम तर पार्थ खडकबाण याने एक मिनिट पस्तिस सेकंद मध्ये पन्नास मीटर अंतर पार करत तृतीय पारितोषिक पटकावले. कळव्यातील मनीषा नगर येथे हि स्पर्धा घेण्यात आली होती. तसेच तीन वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अन्मय मेत्री ला सुवर्ण पदक मिळाले होते.

     दिव्यांग कला केंद्र गेली वर्ष भर या विशेष मुलांच्या विकसासाठी काम करीत आहे. या कलाकेंद्रात नृत्य,नाटक,चित्र या सोबतच मुलांचा व्यक्तिमत्व विकास,व्यावहारिक ज्ञान या गोष्टींवर भर दिला जातो.गेल्या वर्ष भरात मुलांच्या प्रगती बद्दल सर्वच पालक समाधान व्यक्त करत आहेत.   या स्पर्धेतील यशाने दिव्यांग कलाकेंद्राच्या प्रवासात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.हे कला केंद्र केवळ शाळा नसून यात मुलांच्या कला गुणांना वाव दिला जातो.या केंद्रातील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असून जिल्हा स्तरीय नृत्य स्पर्धेत देखील विद्यार्थी विजयी झाले आहेत.खऱ्या अर्थाने या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य निर्विवादपणे सुरु असल्याचे दिसते.  अन्मय ला स्विमिंग ची आवड आहे.वेळ मिळाल्यावर तो सराव करत असतो.या स्पर्धे बद्दल माहिती मिळाताच तो आनंदी झाला,त्याच्या मेहनतिच्या जोरावर त्याने या स्पर्धेत पहिला नंबर मिळवला.दिव्यांग कला केंद्र हे नेहमीच विद्यार्थ्यांना वाव द्यायचे काम करत असते असे अन्मय चे पालक दिनेश मेत्री यांनी सांगितले.  मुलांच्या या कामगिरी बद्दल मी निशब्द आहे.त्याची प्रगती बघून भरावून जायला होते.गेल्या वर्षभरात माझ्या मुलामध्ये भरपूर बदल घडला असून त्याच्यातील सुप्त कलागुण पाहायला मिळत आहेत.हे कला केंद्र म्हणजे केवळ   विशेष मुलांची शाळा नसून हे एक कुटुंब आहे असे पार्थ चे पालक सुभाष खडकबाण यांनी सांगितले. मुलांच्या चेहऱ्यावर येणारे हसू हेच आमच्यासाठी समाधान आहे.गेली वर्षभर आम्ही या विशेष मुलांसाठी काम करीत आहोत.त्यांचा वाढलेला आत्मविश्वास, त्यांच्यातील बदल हेच आमचे यश आहे असे दिव्यांग कला केंद्राचे अध्यक्ष किरण नाकती यांनी सांगितले.

Web Title: Students of Divyang Kala Kendra, Thane, have won special children's swimming competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.