विनयभंगप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्याध्यापकाला सोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 10:52 PM2019-12-28T22:52:36+5:302019-12-28T22:53:20+5:30

तक्रारदार विद्यार्थिनीवर दबावाचा प्रयत्न

Students march to leave headquarters | विनयभंगप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्याध्यापकाला सोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

विनयभंगप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्याध्यापकाला सोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

Next

भिवंडी : शेलार नदीनाका येथील हिंदी माध्यमिक शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला पालकांनी चोप देत पोलिसांकडे स्वाधीन केले. पोलीस कोठडीत असलेल्या प्रमोद नायक या मुख्याध्यापकास सोडावे, या मागणीसाठी शनिवारी विद्यार्थ्यांनी तालुका पोलीस ठाण्यावर धडक दिली.

नायक याला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही बाब विद्यार्थ्यांना समजल्याने त्यांनी शाळा लवकर सुटताच विद्यार्थी व पालकांनी थेट तालुका पोलीस ठाणे गाठले. शाळेचे मुख्याध्यापक निर्दोष आहेत, त्यांना पोलीस कोठडीतून सोडून द्यावे, अशी मागणी करीत जोरजोराने घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दरम्यान, या आंदोलनाची कोणतीही कल्पना नसताना अचानक आलेल्या या विद्यार्थ्यांच्या मोर्चाने प्रारंभी पोलीस बुचकळ्यात पडले होते.

मात्र, त्यानंतर तालुका पोलिसांसह शांतीनगर पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढत त्यांना प्रकरणाचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यानंतर, विद्यार्थी आपापल्या घरी परतले. या आंदोलनामागे शाळा प्रशासन असल्याचे बोलले जात असून त्यांनीच विद्यार्थ्यांसह पालकांना फिर्याद देणाºया विद्यार्थिनीविरोधात भडकावून त्यांना पोलीस ठाण्यात पाठविले असल्याचे बोलले जात आहे.

विद्यार्थ्यांना कुणी फूस लावली याचा घेणार शोध
या प्रकरणात निष्पाप विद्यार्थ्यांना गोवण्याचा प्रयत्न होत असून ही कायदेशीर व न्यायालयीन प्रक्रि या आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कुणी फूस लावून पोलीस ठाण्यात आणून घोषणाबाजी करण्यास लावले, त्याचा तपास करून दोषींविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रि या तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली आहे.

Web Title: Students march to leave headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.