उल्हासनगरच्या विद्यार्थांचा जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास

By सुरेश लोखंडे | Published: September 8, 2022 11:05 PM2022-09-08T23:05:33+5:302022-09-08T23:06:21+5:30

बांधकामाच्या सोयीसाठी येथील रसत्यावरील महावितरणचे उघडे टान्सफारमर व वीजेच्या तारा यामुळे भीतीदायक चित्र होतं.

Students of Ulhasnagar travel through flood waters with their lives in hand | उल्हासनगरच्या विद्यार्थांचा जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास

उल्हासनगरच्या विद्यार्थांचा जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास

Next

पावसाचा आंदाज घेऊन उल्हासनगर येथील एसईएस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सायंकाळी सोडण्यात आले. पण तेवढ्यात या शाळेच्या वरील टेकडीवर पडल्या पावसाच्या पाण्याच लोंढा आला आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून जीव मुठीत घेत घर गाठावे लागले.

या शाळेसमोर आधीच सिमेंटच्या रोडचे काम सुरू आहे. दोन्ही बाजुला खाडीत जाणाऱ्या पाच फूट खोल उघडे गटारं आहेत. त्यात या पुराच्या पाण्याचा लोंढा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारा. त्यामुळे या पावसादरम्यान खेमाणीच्या या परिसरात एकच हाहाकार उडाला. मुलांना घेण्यासाठी आलेल्या मातांनी एकच कल्लोळ केल्यामुळे लहान मुलं व नागरिक याची चांगलीच धावपळपळ उडाली.    

बांधकामाच्या सोयीसाठी येथील रसत्यावरील महावितरणचे उघडे टान्सफारमर व वीजेच्या तारा यामुळे भीतीदायक चित्र होतं. उल्हासनगर मनपा व वीज मंडळ यांनी नागरिकांच्या जीवीताची सुपारी घेतली असल्याचा आरोप जाणकारांकडून होत आहेत. 

Web Title: Students of Ulhasnagar travel through flood waters with their lives in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.