ठाण्यात बेंगलोरच्या जैन युनिव्हर्सिटी विरोधात विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन
By सुरेश लोखंडे | Published: February 14, 2023 05:33 PM2023-02-14T17:33:42+5:302023-02-14T17:36:26+5:30
ठाणे : जैन विद्यापीठ हे खासगी विद्यापीठ 2009 पासून बेंगलोरमध्ये कार्यरत आहे. त्या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट विभागाने युवक महोत्सवात त्यांच्या ...
ठाणे : जैन विद्यापीठ हे खासगी विद्यापीठ 2009 पासून बेंगलोरमध्ये कार्यरत आहे. त्या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट विभागाने युवक महोत्सवात त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित समाजाबद्दल अपमानित शब्द प्रयोग करत पथनाट्य सादर केल्याचा आरोप करीत त्याविरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी एकत्र येत धरणे आंदोलन छेडल्याचे येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी रूपेश हुंबरे यांनी स्पष्ट केले.
शासकीय विश्रामगृहा समोर या विद्याथ्यार्ंनी एकत्र येत या सम्यक विद्यार्थी आंदाेलनाचे अध्यक्ष् महेश भारतीय यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. यावेळी या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळात डॉ. प्रदीप जावळे, रवी कांबळे, राजू खरात, यांच्यासह युवा वंचित आघाडी, महिला आघाडीचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी या विद्यार्थी आंदोलकांनी या विद्यापीठाची मान्यता युजीसीने रद्द करावी. कुलगुरू, विभाग प्रमुखाना देशात परदेशात नोकरीसाठी पात्र ठरवू नये आदी विविध मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या. यावेळी जयवंत बैले, कमलेश ऊबाळे, अनिकेत मोरे आदी उपस्थित होते.