तानसा नदीच्या धरणातील पाण्यातून बोटीने वाट काढत विद्यार्थी गाठतात शाळा

By सुरेश लोखंडे | Published: June 2, 2024 07:31 PM2024-06-02T19:31:24+5:302024-06-02T19:31:54+5:30

तानसा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील बोराळे पाडा भागातील विद्यार्थ्यांसाठी या बोटीचा वापर सक्रिय पणे सुरू आहे.

Students reach the school by boat through the water of Tansa river dam | तानसा नदीच्या धरणातील पाण्यातून बोटीने वाट काढत विद्यार्थी गाठतात शाळा

तानसा नदीच्या धरणातील पाण्यातून बोटीने वाट काढत विद्यार्थी गाठतात शाळा

ठाणे : जिल्ह्यातील तानसा नदीवरील धरणक्षेत्रातील बोराळे पाडा ते सावरदेव पाडा भागातील मुलांना शाळेत जाण्शाळेत तानसा नदी पात्रातून बोटीने प्रवास करावा लागतो. आजही कडकडीत उन्हाळ्यात या नदीसह तानसा धरणातील पाण्यातून रस्ता काढत विद्यार्थी शाळा गाठण्यासाठी या यांत्रिकी बोटीचा वापर येजा करण्यासाठी करीत असल्याचे वास्तव उघड झाले आहे. ही बोट बंद पडलेली नसून ती सेवेसाठी सदैव सज्ज असल्याचा दावा शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांनी केला आहे.

या तानसा नदीच्या तरण पात्रातून या यांत्रिकी बोटीने हिवाळे यांनी विद्यार्थ्यांसह प्रवास करुन बोटीची प्रत्पक्ष पाहाणी करुन ही बोट दुसरा असल्याची खात्री केली. यावेळी बोटीतून स्वतः व वर्षभर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यासह हिवाळे यांनी आज प्रवास केला. शहापूर तालुक्यातील बोराळे भागातील मुलांना शाळेत येजा करण्यासाठी जुन्या बोटीचा वापर होत होता. परंतु या बोटी धोकादायक असल्याने राज्य शासनाने या विद्यार्थ्यांसाठी नवीन यांत्रिक बोट वर्षभरापूर्वी उपस्थित करून दिली आहे.

राज्य शासनाने दिलेली ही यांत्रिक बोट बंद असल्याची चर्चा होती. त्यास अनुसरून ठाणे  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी तातडीने याची दखल घेऊन शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकार्यांना जागेवर जाऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज  हिवाळे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. उपलब्ध करून देण्यात आलेली बोट दुरुस्त असून ती वापरात असल्याची खात्री करण्यासाठी हिवाळे यांनी काही विद्यार्थ्यांसह या बोटीतून आज प्रवास केला. सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने ही यांत्रिक बोट उभी करून ठेवण्यात आलेली आहे. शाळा सुरू होताच या बोटीचा वापर रोज करण्यात येईल. या वेळी या बोटीचा वर्षभर वापर करणारा विद्यार्थी कैलाश चिमडा व सावरदेव मधील नागरिक प्रदीप हे सुद्धा उपस्थित होते. ही बोट वर्षभर सुरू होती व पेट्रोल ची कोणतीही अडचण नाही. या बोटी शिवाय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांनी या वर्षी न्यूक्लिअस बजेट योजनेतून आणखी एक नवीन आधुनिक यांत्रिक बोट येथे उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता दोन्ही बोटी या कार्यरत रहाणार आहेत. तानसा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील बोराळे पाडा भागातील विद्यार्थ्यांसाठी या बोटीचा वापर सक्रिय पणे सुरू आहे.

Web Title: Students reach the school by boat through the water of Tansa river dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.