विद्यार्थ्यांनी सरकारी अनुदानाचा फायदा उच्च शिक्षणासाठी घ्यावा; पदवीदान कार्यक्रमात पालिका आयुक्तांचा विद्यार्थ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 10:09 PM2018-03-08T22:09:57+5:302018-03-08T22:09:57+5:30

शिक्षणासाठी विविध सरकारी अनुदान उपलब्ध असुन त्याचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन शैक्षणिक दर्जा वाढवावा, असा सल्ला मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी गुरुवारी येथील शंकर नारायण महाविद्यालयात आयोजित पदवीदान कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. 

Students should take advantage of government funding for higher education; Advice to the municipal commissioner's students in the graduation program | विद्यार्थ्यांनी सरकारी अनुदानाचा फायदा उच्च शिक्षणासाठी घ्यावा; पदवीदान कार्यक्रमात पालिका आयुक्तांचा विद्यार्थ्यांना सल्ला

विद्यार्थ्यांनी सरकारी अनुदानाचा फायदा उच्च शिक्षणासाठी घ्यावा; पदवीदान कार्यक्रमात पालिका आयुक्तांचा विद्यार्थ्यांना सल्ला

Next

भार्इंदर - शिक्षणासाठी विविध सरकारी अनुदान उपलब्ध असुन त्याचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन शैक्षणिक दर्जा वाढवावा, असा सल्ला मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी गुरुवारी येथील शंकर नारायण महाविद्यालयात आयोजित पदवीदान कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. 

पुढे बोलताना त्यांनी, आपण सर्व मध्यमवर्गीय आहोत त्यातील बहुतांशी विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ असतानाही  आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नाही. परिणामी शिक्षण अर्धवट सोडावे लागते. भविष्यात त्याचे परिणाम त्या विद्यार्थ्यांना भोगावे लागतात. भविष्यातील हा भोग दुर करण्यासाठ िविद्यार्थ्यांनी सकरारी अनुदानांचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.  केंद्रीय लोकसेवा तसेच महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देऊन केंद्रीय व राज्य लोकसेवेतील उच्च पदस्थ अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. माणसांनी शिकलं पाहिजे, त्यांनी शिकलेलं आचरणात आणले पाहिजे, असे आवाहन करुन त्यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लेक वाचवा, लेक वाढवा, लेक शिकवा असा संदेश दिला. कार्यक्रमात विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय असल्याचा आनंद व्यक्त करीत त्यांनी आई नसेल तर मुलांचा जन्म होणे शक्यच नाही व त्यामुळे लेक वाचवलीच पाहिजे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात महिलांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी दशेत उच्च स्तरावर पोहोचेपर्यंत विद्यार्थ्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. मात्र त्या संघर्षाला बळी न पडता संघषार्शी सतत दोन हात करणे हे यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासह शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करीत अधिकाधिक झाडे लावण्याचे आवाहन केले. यावेळी शंकर नारायण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी १९९४ मध्ये सुरु झालेल्या महाविद्यालयाची यशोगाथा सांगुन आजमितीस महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी विविध शाखेत शिक्षण घेत असल्याचे समाधान व्यक्त केले. महाविद्यालयातील विविध शाखेतील एकूण ८१२ पदवी व पदयुत्तर अभ्यासक्रम पुर्ण करणाय््राा विद्यार्थ्यांना यावेळी पदवीदान करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव महेश म्हात्रे, माजी नगरसेविका कल्पना म्हात्रे, एमबीए शाखेचे संचालक डॉ. भूपेश राणे, विनय पाटील, प्राचार्या रंजना पाटील यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Students should take advantage of government funding for higher education; Advice to the municipal commissioner's students in the graduation program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.