तेलंगणा राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडून ठाणे जि.प.च्या कामकाजाचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 03:04 PM2018-10-25T15:04:24+5:302018-10-25T15:10:43+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आर्थिक सक्षमीकरणा संदर्भात तेलंगणा वित्त आयोगाचा अभ्यास दौरा सुरु असून त्यांनी जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या विविध योजना, नाविन्यपूर्ण उपक्र म तसेच वित्तीय बाबींची माहिती जाणून घेतली. यावेळी अध्यक्षांच्या समवेत स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी यांच्या कामकाजाची कार्यपद्धती, त्यांचे अधिकार तसेच हक्कां विषयी जाणून घेतले.

Study of the work of Thane District from the President of State Finance Commission of Telangana | तेलंगणा राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडून ठाणे जि.प.च्या कामकाजाचा अभ्यास

तेलंगणा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष राजेश्याम गौड आणिआयोगाचे सदस्य एम.चेन्नईहा यांनी ठाणे जिल्हा परिषदेला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांनी त्यांचे स्वागत केले.

Next
ठळक मुद्दे तेलंगणा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष राजेश्याम गौड आणिआयोगाचे सदस्य एम.चेन्नईहाराबवलेल्या केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनाच्या यशस्वितेविषयी विविध योजनांच्या अंमलबजावणीसह कामकाजाची माहिती घेतली


ठाणे : तेलंगणा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष राजेश्याम गौड आणिआयोगाचे सदस्य एम.चेन्नईहा यांनी ठाणेजिल्हा परिषदेला भेट देऊन विविध योजनांच्या अंमलबजावणीसह कामकाजाची माहिती घेतली. याशिवाय आवश्यक त्या निधी संदर्भात पाठपुरावा करण्याच्या मुद्यांवर देखील चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांनी त्यांचे स्वागत केले.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आर्थिक सक्षमीकरणा संदर्भात तेलंगणा वित्त आयोगाचा अभ्यास दौरा सुरु असून त्यांनी जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या विविध योजना, नाविन्यपूर्ण उपक्र म तसेच वित्तीय बाबींची माहिती जाणून घेतली. यावेळी अध्यक्षांच्या समवेत स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी यांच्या कामकाजाची कार्यपद्धती, त्यांचे अधिकार तसेच हक्कां विषयी जाणून घेतले. त्याच बरोबर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण भागातील सोई-सुविधां बाबतही आयोगाव्दारे या बैठकीत चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषदेने राबवलेल्या केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनाच्या यशस्वितेविषयी सीईओंनी सादरीकरणाच्या माध्यमातून आयोगाला माहिती दिली. यावेळी आयोगाने राबवलेल्या योजनां बद्दल समाधान व्यक्त केले.आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाचे आर्थिक बळकटीकरण होण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या उपाय योजना करायला हव्यात, त्यासाठी निधीची उपलब्धता कसा प्रकारे करायला हवी याविषयी संगोपांग चर्चा केली. यावेळी समाजकल्याण समिती सभापती निखिल बरोरा, अंबरनाथ पंचायत समिती सभापती स्वप्नाली भोईर, जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे, पुष्पा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) डी. वाय. जाधव , उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी मयूर हिंगणे, भिवंडी पंचायत समिती गट विकास अधिकारी अशोक सोनटक्के आदींची यावेळी उपस्थित होती
..........
फोटो - २५ठाणे झेडपी तेलंगणा आयोग भेट

Web Title: Study of the work of Thane District from the President of State Finance Commission of Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.