राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुरबाडमध्ये खिंडार-ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांचा शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:02 PM2019-08-31T17:02:31+5:302019-08-31T17:21:59+5:30

सुभाष पवार यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती किशोर जाधव, समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता गांगड, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इरफान भुरे, मुरबाड बाजार समितीचे सभापती चंद्रकांत बोष्टे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्राजक्ता भावार्थे, दिपाली झुगरे, किसन गिरा, निखिल पांडूरंग बरोरा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुरबाड तालुकाध्यक्ष रामभाऊ दळवी, कल्याण तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकर, रवींद्र टेंबे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Subhash Pawar, Vice President of Khindar-Thane Zilla Parishad enters NCP in Shiv Sena | राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुरबाडमध्ये खिंडार-ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुभाष पवार यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत पवार यांचे शिवसेनेत स्वागत केले.

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉंग्रेसला मुरबाडमध्ये खिंडारशिवसेनेत प्रवेश केला असल्याचे पवार यांनी जाहीर केले.समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता गांगडभिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इरफान भुरे,

ठाणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुरबाड तालुक्यात खिंडार पडले असून, ठाणेजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुभाष पवार यांच्यासह भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इरफान भुरे आदी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनाभवनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रवेश देत ज्या कारणासाठी आपण एकत्र येत आहोत, ते कारण पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी पवार यांना शुभेच्छा  दिल्या.

        यावेळी शिवसेनाभवनात शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे पवार यांनी जाहीर केले. या वेळी ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई, राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे, माजी आमदार पांडूरंग बरोरा आदी उपस्थित होते. सुभाष पवार यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती किशोर जाधव, समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता गांगड, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इरफान भुरे, मुरबाड बाजार समितीचे सभापती चंद्रकांत बोष्टे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्राजक्ता भावार्थे, दिपाली झुगरे, किसन गिरा, निखिल पांडूरंग बरोरा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुरबाड तालुकाध्यक्ष रामभाऊ दळवी, कल्याण तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकर, रवींद्र टेंबे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

      मुरबाडची चार टर्म आमदारकी भूषविलेल्या गोटीराम पवार यांचे सुभाष हे पुत्र आहेत. सुभाष पवार यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात मोठे जाळे तयार केले आहे. गोटीराम पवार यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल ५० हजार मते मिळविली होती. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतरच्या निवडणुकीतही मुरबाड विधानसभा मतदारसंघातून मुरबाड तालुक्यातून त्यांनी आघाडी मिळाली होती.

        ठाणे जिल्हा परिषदेत पावणेदोन वर्षांपासून शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी आहे. त्यात सुभाष पवार यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. यापूर्वी पवार यांनी मुरबाड पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ते संचालक आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. जनसेवा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात शैक्षणिक जाळे निर्माण करण्यात आले आहे. 

        ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच शिवसेनेने ग्रामीण भागाच्या विकासाला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्य करताना शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांची विकासाप्रती भूमिका जवळून पाहता आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, असे सुभाष पवार यांनी स्पष्ट केले. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच अग्रक्रम दिला. शिवसेनेने कधीही पक्षभेद केला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ठाणे जिल्ह्यातील तळागाळापर्यंत शिवसेनेला आणखी मजबूत करण्यासाठी कार्य करणार आहोत. इतर पक्षात प्रवेश करताना त्या पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी असते. मात्र, शिवसेनेत प्रवेश करताना शिवसैनिकांचा उत्साह पाहावयास मिळत असल्याचे पवार यांनी आवर्जून नमूद केले.

 

2 Attachments

 

 

ReplyReply allForward

  

 

Web Title: Subhash Pawar, Vice President of Khindar-Thane Zilla Parishad enters NCP in Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.