चौकशी अहवाल २५ ऑगस्टपर्यंत सादर करा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 08:27 AM2023-08-15T08:27:42+5:302023-08-15T08:28:11+5:30
या समितीला २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारितील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील उपचारादरम्यान १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवेतील आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच या समितीला २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या रुग्णालयात १० तासांत १८ मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली होती. या सर्व घटनेची सखोल चौकशी व्हावी याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाला समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.