खाडीत उडी मारणाऱ्याचे प्राण वाचविण्यात यश, स्थानिकांच्या प्रसंगावधनामुळे तरुणाचा जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 03:33 PM2022-08-12T15:33:14+5:302022-08-12T15:33:42+5:30

Thane: कौटुंबिक कलहामुळे कळवा खाडीमध्ये उडी घेतलेल्या गंगाधर जाधव (३५) या तरुणाला स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे पथक हे घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच सुखरूप खाडीतून बाहेर काढले.

Success in saving the life of the person who jumped into the creek, the youth's life was saved due to the incident of the locals | खाडीत उडी मारणाऱ्याचे प्राण वाचविण्यात यश, स्थानिकांच्या प्रसंगावधनामुळे तरुणाचा जीव वाचला

खाडीत उडी मारणाऱ्याचे प्राण वाचविण्यात यश, स्थानिकांच्या प्रसंगावधनामुळे तरुणाचा जीव वाचला

Next

- जितेंद्र कालेकर
ठाणे - कौटुंबिक कलहामुळे कळवा खाडीमध्ये उडी घेतलेल्या गंगाधर जाधव (३५) या तरुणाला स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे पथक हे घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच सुखरूप खाडीतून बाहेर काढले. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. कळवा,भीम नगर येथे राहणाऱ्या गंगाधर याने कौटुंबिक भांडण झाल्यानंतर खाडीमध्ये उडी मारली. याबाबतची माहिती राठोड नामक व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पण, त्याला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. .

Web Title: Success in saving the life of the person who jumped into the creek, the youth's life was saved due to the incident of the locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.