ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत!

By सुरेश लोखंडे | Published: June 14, 2024 06:14 PM2024-06-14T18:14:50+5:302024-06-14T18:15:02+5:30

हा शालेय प्रवेशाचा कार्यक्रम २० जून रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.

Success of Mobile School in Thane District This year 450 street children will go to school | ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत!

ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत!

ठाणे : रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजना हाती घेतली आहे. यामध्ये फिरतेपथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना राबविली जात असून या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील ४५० ते ५०० बालकांना यंदाच्या २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश दिला जात आहे. हा शालेय प्रवेशाचा कार्यक्रम २० जून रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.

रस्त्यावरील बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात फिरतेपथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविली जात आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारी ते ऑगस्ट२०१३ पर्यंत हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या राबविण्यात आला. साधारणतः १७० रस्त्यावरील बालकांना २०२३ - २०२४ या शैक्षणिक वर्षामध्ये ठाणे व भिवंडी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला हाेता. आता या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील बालकांबरोबर महिला व बालविकास विभागाच्या ठाणे कार्यालयाने गेले ६ ते ७ महिने काम करुन बालकांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणाची गोडी वाढविली आहे. या बालकांना शाळेमध्ये प्रवेश द्यावा व त्यांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे, यासाठी बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्यानुसार यावर्षी २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षामध्ये रस्त्यावर राहणारी व शाळेत न जाणारी ४५० जे ५०० बालके विविध महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात येणार आहेत.

              या बालकांच्या शाळेचे प्रवेशपत्र महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महिला व बालविकास आयुक्त उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच या वर्षात १० वी, १२ वी उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील ५० मुलांचा सत्कार सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
 

Web Title: Success of Mobile School in Thane District This year 450 street children will go to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.