५०० फूट दरीतून मृतदेह काढण्यात तरुणांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:53 AM2021-02-20T05:53:39+5:302021-02-20T05:53:39+5:30

कसारा : इगतपुरी तालुक्यातील मानवडे गावातील एका महिलेने ५०० फूट खोल दरीत आत्महत्या केल्याची माहिती इगतपुरी आणि कसारा पोलिसांना ...

Success of youth in removing bodies from 500 feet valley | ५०० फूट दरीतून मृतदेह काढण्यात तरुणांना यश

५०० फूट दरीतून मृतदेह काढण्यात तरुणांना यश

Next

कसारा : इगतपुरी तालुक्यातील मानवडे गावातील एका महिलेने ५०० फूट खोल दरीत आत्महत्या केल्याची माहिती इगतपुरी आणि कसारा पोलिसांना मिळाली. या प्रकरणी महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली होती.

इतक्या खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढणे शक्य नसल्याने कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये, गणेश माळी, इगतपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम शहापूर व नाशिक रेस्क्यू टीमला पाचारण केले. बुधवारी सकाळी आठ वाजता दोन्ही टीमने नियोजन करीत शोधमोहीम हाती घेतली. ट्रेक व रोप साहित्याच्या मदतीने काही सदस्य दरीत उतरले तर काही सदस्यांनी पूर्ण माईनदरीचा कडा येथे शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या महिलेचा मृतदेह शोधण्यास टीमला यश आले. गीता अशोक वीर असे त्या मृत महिलेचे नाव आहे. ३५० फुटांवर एका कपारीत मृतदेह अडकला होता. या मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख श्याम धुमाळ, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, विनोद आयरे, प्रसाद दोरे, लक्ष्मण वाघ, देवा वाघ, धर्मेंद्र ठाकूर, बबन सोनवणे, नाशिक रेस्क्यू टीमचे प्रमुख दयानंद कोळी, संतोष जगताप, सुजीत पंडित, ओम उगले, विशाल मालगावकर, मानस लोहकरे, भीमाशंकर सहाने, गौरव रहाणे, संकेत क्षीरसागर, नीलेश पवार, सागर जोशी, मनोज कनोजिया सहभागी झाले होते.

Web Title: Success of youth in removing bodies from 500 feet valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.