वर्षभरात झाला ३० खुनांचा यशस्वी तपास
By admin | Published: January 6, 2017 06:04 AM2017-01-06T06:04:56+5:302017-01-06T06:04:56+5:30
गेल्या वर्षभरात वसई तालुक्यातील सात पोलीस ठाण्यात मिळून खूनाचे एकूण ३८ गुन्हे दाखल झाले होते. यातील ३० गुन्ह्यांची उकल झाली आहे.
विरार : गेल्या वर्षभरात वसई तालुक्यातील सात पोलीस ठाण्यात मिळून खूनाचे एकूण ३८ गुन्हे दाखल झाले होते. यातील ३० गुन्ह्यांची उकल झाली आहे. मात्र, आठ गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नाही.
विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ३० हत्याकांडांचा तपास करण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरले होते. त्यामुळे त्यांचा तपास स्थानिक गुन्हा शाखेवर सोपविण्यात आला होता.
उर्वरित आठ गुन्ह्यांचा तपास करण्या पोलीस अपयशी ठरले आहेत. विरारमधील धान्य व्यापाऱ्याचा खून आणि वालीव येथे महिला आणि तिच्या मुलीची झालेली दुहेरी हत्या गाजली होती. या गुन्ह्याचा उलगडा अद्याप झालेला नाही. २०१५ मध्ये वसई तालुक्यात ४४ हत्या झाल्या होत्या. त्यापैकी २२ गुन्ह्यांची उकल झाली असून अद्याप २२ गुन्हयांचा तपास लागलेला नाही.
शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात ८२ हत्या झाल्या होत्या. यातील एकूण ३० हत्याकांडातील मारेकरी अदयाप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. याबाबत पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता आपण सुट्टीवर असल्याचे सांगत अधिक काही सांगण्यास नकार दिला. (वार्ताहर)