ठाण्यातील कोपरी पुलाच्या सात लोखंडी गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 03:56 PM2021-01-17T15:56:33+5:302021-01-17T15:57:38+5:30

Thane : गर्डर हे 35 मीटर लांबीचे व 35 मेट्रिक टन वजनाचे होते. गर्डर उचलण्यासाठी 5 क्रेन, 5 ट्रेलर आणि एक पुलर अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती.

Successful launch of seven iron girders of Kopari bridge in Thane | ठाण्यातील कोपरी पुलाच्या सात लोखंडी गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग 

ठाण्यातील कोपरी पुलाच्या सात लोखंडी गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग 

Next

ठाणे: कोपरी पुलाच्या आनंदनगर भुयारी मार्गावरील सात गर्डर बसविण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू असताना ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी पुलावर रात्री ११  वाजता आपली उपस्थिती नोंदवली. त्यानंतर पहिल्या गर्डरचे लॉन्चिंग होत असताना त्यांनी शास्त्रीय पद्धतीने ब्राह्मणाद्वारे पूजा करून गर्डरचे काम सुरू केले. 

रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत खासदार विचारे उपस्थित होते. त्याठिकाणी सर्व गर्डर यशस्वीरित्या बसविल्यानंतर खासदार विचारे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतुक करून त्यांच्यासोबत फोटो काढले.  त्यावेळी त्यांच्यासोबत ववाहतूक  शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त पालवे, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता प्रकाश भांबरे, कार्यकारी अभियंता विनय सुर्वे आदी उपस्थित होते. तसेच, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे , शिवसैनिक रमाकांत पाटील, किरण नाकती हे सुद्धा यावेळी  उपस्थित होते.  

गर्डर ही 35 मीटर लांबीची व 35 मेट्रिक टन वजनाची होती. गर्डर उचलण्यासाठी 5 क्रेन, 5 ट्रेलर आणि एक पुलर अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती.
 

Web Title: Successful launch of seven iron girders of Kopari bridge in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे