महापालिका अधिकारी कल्पिता पिंपळेंवर यशस्वी शस्त्रक्रिया; छाटलेली बोटे पुन्हा जोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 07:06 PM2021-08-31T19:06:17+5:302021-08-31T20:55:40+5:30
माजिवाडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी कारवाई दरम्यान अमरजीत यादव नावाच्या फेरीवाल्याने चाकूने हल्ला चढविला.
ठाणे : अनाधिकृत फेरीवाल्याकडून झालेल्या चाकू हल्यात डाव्या हाताची दोन बोटे तुटल्यानंतर सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. हातापासून वेगळी झालेली त्यांची बोटे रु ग्णालयाच्या डॉक्टरांनी पुन्हा जोडली आहेत. या बोटांमध्ये पुर्वीप्रमाणो चेतना असेल की नाही याविषयी आताच सांगता येणार नसले तरी शस्त्रक्रियेच्या पुढील ४८ तासांनंतरच ते स्पष्ट होईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
माजिवाडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी कारवाई दरम्यान अमरजीत यादव नावाच्या फेरीवाल्याने चाकूने हल्ला चढविला. यात पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटली गेली. तसेच डोक्याला देखील काहीसा मार लागला. त्यानंतर त्यांनी उपचारार्थ सुरवातीला घोडंबदर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रात्री उशिरा कॅडबरी येथील खाजगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले आहे. दरम्यान रस्त्यावर पडलेल्या त्यांच्या बोटांचे तुकडे घेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात आणली.
त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली असून त्यांची तुटलेली बोटे पुन्हा जोडण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला आहे. ही शस्त्नक्रिया यशस्वी झाली असून पिंपळे यांची प्रकृतीही स्थिरअसल्याची माहिती अतिक्रमण नियंत्नण विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी दिली. परंतु त्या बोटांची हालचाल कितपत होईल याबाबत पुढील ४८ तासानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
घाबरणार नाही...डगमगणार नाही...
बेकायदा फेरिवाल्यांविरोधात घाबरून राहिलो तर उद्या फेरिवाले फायदा उठवतील. त्यांच्यावर कारवाई करणं माझं कामच आहे. त्यामुळे घाबरणार नाही. पूर्ण बरी झाल्यानंतर पुन्हा बेकायदेशीर फेरिवाल्यांवर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया सहाय्यक आयुक्ता कल्पिता पिंपळे यांनी दिली आहे.