कोरोनातून मुक्त झाल्यानंतर ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने अशा व्यक्त केल्या भावना

By जितेंद्र कालेकर | Published: April 27, 2020 10:00 PM2020-04-27T22:00:50+5:302020-04-27T22:05:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे शहराच्या सीमेवरील आनंदनगर चेकनाका याठिकाणी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांचे पोलीस उपायुक्त ...

 Such sentiments were expressed by a senior police inspector in Thane after his release from Corona | कोरोनातून मुक्त झाल्यानंतर ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने अशा व्यक्त केल्या भावना

ठाण्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त अधिकाऱ्यासह दोघांनी केली कोरोनावर मात

googlenewsNext
ठळक मुद्देठाण्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त अधिकाऱ्यासह दोघांनी केली कोरोनावर मातठाण्याच्या वेशीवर पोलीस उपायुक्तांनी केले स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहराच्या सीमेवरील आनंदनगर चेकनाका याठिकाणी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी स्वागत केले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या स्वागतामुळे तसेच कोरोनासारख्या साथीच्या आजारातून सुखरुप बरे झाल्यामुळे या अधिकाºयाचा भावना अनावर झाल्या. ‘मी लवकरच कामावर रुजू होईल, असे अश्रूंना वाट मोकळी करुन देत त्यांनी उपायुक्त बुरसे यांना तशाही परिस्थितीमध्ये सांगितले.
नाशिक येथून मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला. आता आणखी १४ दिवस त्यांना होम कॉरंटाईन रहावे लागणार आहे. त्यामुळे ते नाशिक येथील आपल्या घरी जाणार होते. ठाण्यात आनंदनगर चेक नाका येथून ते जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त बुरसे यांच्यासह कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर, मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोली निरीक्षक अनिल मांगले तसेच वाहतूक विभागाच्या कर्मचाºयांनी टाळया वाजवून फुलांचा वर्षाव करीत त्यांचे उत्साहात स्वागत केले. आजारातून सुखरुप बरे झाल्यानंतर प्रथमच आपल्या सहकाºयांना आणि वरिष्ठांना पाहून ते भारावून गेले. क्षणभर त्यांना आपले आश्रूही आवरता आले नाही. काही वेळातच ते आपल्या वाहनातून पुन्हा नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाले.
दरम्यान, मुंब्रा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस निरीक्षकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे एकाला रविवारी ठाण्यातील सफायर रुग्णालयातून तर दुसºयाला मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयातून सोमवारी घरी सोडण्यात आले आहे. दोघांचीही कोरोनातून सुखरुप मुक्तता झाल्यामुळे ठाणे शहर पोलिसांना दिलासा मिळाला आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याचे चार कर्मचारी आणि अन्य दोन अधिकारी अशा सात जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकीच एका निरीक्षकाला दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या होरायझनमधून तर अन्य एकाला रविवारी रात्री घोडबंदर रोडवरील सफायर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यापाठोपाठ सोमवारी सायंकाळी वरिष्ठ निरीक्षकाचीही कोरोनाची चाचणी ही निगेटीव्ह आल्यामुळे त्यांनाही अंधेरीतील सेव्हन हिल्स या रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. थेट वरिष्ठ निरीक्षकालाच कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंब्रा पोलीस ठाण्यासह संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या वर्तुळात चिंता व्यक्त होत होती. त्यांनीही कोरोनावर मात केल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांसह ठाणे शहर पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title:  Such sentiments were expressed by a senior police inspector in Thane after his release from Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.