Video: अचानक नातवासह गल्लीतल्या किराणा दुकानात आले CM शिंदे, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 09:02 AM2023-03-07T09:02:59+5:302023-03-07T09:18:49+5:30
मुख्यमंत्री शिंदे आपल्या नातवाला घेऊन किसननगर येथील होळी उत्सवात सहभागी होते.
ठाणे - मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंमधला कार्यकर्ता किंवा लोकांमध्ये मिसळणारा नेता हे बिरुद राज्याच्या प्रमुखपदी असतानाही सातत्याने दिसून येते. गणपती उत्सवात घरोघरो जाऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खुश केलं, तर नवरात्री उत्सवातही आपल्या ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाचा आनंद द्विगुणीत केला होता. आता, मुख्यमंत्री शिंदे ठाण्यातील ज्या गल्लीत लहानाचे मोठे झाले, त्या गल्लीतील होळीच्या कार्यक्रमासाठी किसननगरमध्ये पोहोचले होते. यावेळी, आपल्या नातवाला सोबत घेऊन ते होळीचा आनंद घेते होते. मात्र, नातवाच्या हट्टापायी जवळील एका किराणा दुकानात जाऊन त्यांनी खरेदी केली. सध्या त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
मुख्यमंत्री शिंदे आपल्या नातवाला घेऊन किसननगर येथील होळी उत्सवात सहभागी होते. यावेळी, मोठा लवाजमा, फौजफाटा आणि कार्यकर्त्यांची गर्दीही त्यांच्यासमवेत होती. मात्र, याचवेळी सोबत असलेल्या नातवाने जवळील दुकानातून काहीतरी खरेदी करण्याचा हट्ट केला. त्यामुळे, स्वत: मुख्यमंत्री शिंदे आपल्या नातवाला घेऊन जवळील किराणा दुकानात पोहोचले. त्यांच्यासमवेत मोठी गर्दीही यावेळी होती. अचानक मुख्यमंत्री आपल्या किराणा दुकानात आलेले पाहून दुकानदारही हरखुन गेला. त्याने लहान रुद्रांशसाठी खाऊ पुड्यात बांधून खाऊ दिला. तर, रुद्रांशसाठी दोन चेंडूही मुख्यमंत्र्यांनी खरेदी केली. यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे यांनी दुकानदाराजवळ येऊन घेतलेल्या मालाचे पैसे दिले.
ठाणे - मुख्यमंत्र्यांनी पुरवला नातवाचा हट्ट, गल्लीतल्या दुकानातून केली खरेदी pic.twitter.com/EBzVLdSFm6
— Lokmat (@lokmat) March 7, 2023
दरम्यान, ज्या किसननगरमध्ये लहानाचे मोठे झाले तिथे होळीच्या निमित्ताने गेले होते. यावेळेस त्यांच्या सोबत त्यांचा नातू रुंद्राश देखिल होता. होळी दहन झाल्यानंतर रुंद्राशने आजोबांकडे दुकानातून काही तरी घेऊन द्या असा हट्ट धरला होता. अखेर, मुख्यमंत्री बनलेल्या आजोबांनी नातवाचा हट्ट पूर्ण केला.