भिवंडीत विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Updated: January 11, 2024 17:28 IST2024-01-11T17:28:30+5:302024-01-11T17:28:42+5:30
कविता परिमल ठाकूर असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहित मयत महिलेचे नाव आहे

भिवंडीत विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी: सासरच्या मंडळींच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने स्वयंपाक घरातील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना भिवंडीतील ठाकराचा पाडा येथे शनिवारी घडली आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता परिमल ठाकूर असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहित मयत महिलेचे नाव आहे. कविता हिला ती परिमल व सासू-सासर्यांसह नणंद हे सर्व कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असत. पतीसह सासरच्या मंडळींच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर कविता हिने स्वयंपाक घरातील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मयत कविता हिचे वडील कैलास आत्माराम भोईर वय ५६ वर्ष रा.पिंपळगाव यांनी मयत मुलीचा पती परिमल एकनाथ ठाकुर, सासरे एकनाथ बाळु ठाकुर, सासु केसर एकनाथ ठाकुर, दिर अलंकार एकनाथ ठाकुर, जाऊबाई अर्चना अलंकार ठाकुर, व ननंद अलका मोतीराम पाटील, रा- दिवे,व स्विटी उमेश चौधरी, रा. टेमघर अशा ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.