ठाण्यातील खासगी वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:59 PM2020-09-25T21:59:44+5:302020-09-25T22:03:04+5:30

ठाण्याच्या यशोधनगर येथील एका खासगी वाहन चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले

Suicide by strangulation of a private driver in Thane | ठाण्यातील खासगी वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Next
ठळक मुद्देवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हाआत्महत्येचे कारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: यशोधननगर येथील रोहित शिवाजी आवटे (२७, रा. देवेंद्र अपार्टमेंट, ठाणे) या चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारुचे व्यसन असलेला रोहित देवेंद्र अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर वास्तव्याला होता. तो वेगवेगळया वाहनांवर हंगामी चालक म्हणून नोकरी करीत होता. लॉकडाऊनमुळे गेली अनेक दिवस त्याला कामही नव्हते. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या शेजारील एका मित्राने त्याच्या घराचा दरवाजा वाजविला. मात्र, आतून त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संशय आल्यामुळे त्याने ही माहिती वर्तकनगर पोलिसांना दिली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सुहास हाटेकर तसेच इमारतीमधील काही रहिवाशांनी त्याच्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी घरात तो गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला. घरात सिगारेटची थोटके आणि दारुच्या बाटल्याही आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे आई वडिल आणि इतर नातेवाईक हे सातारा येथे असून त्याच्या आत्महत्येची माहिती त्यांना देण्यात आली आहे. मात्र, त्याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, हे समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हटेकर हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by strangulation of a private driver in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.