लोकलखाली महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 05:18 IST2019-04-16T05:18:41+5:302019-04-16T05:18:43+5:30
ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-५ येथे कर्जत लोकल येताच एका अनोळखी ३५ वर्षीय महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

लोकलखाली महिलेची आत्महत्या
ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-५ येथे कर्जत लोकल येताच एका अनोळखी ३५ वर्षीय महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
तिची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. त्या महिलेने लोकल येताच उडी घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीसांत नोंद केली आहे.