‘सुमगो’त कामगार ठार
By admin | Published: May 12, 2017 01:34 AM2017-05-12T01:34:46+5:302017-05-12T01:34:46+5:30
मुरबाड औद्योगिक क्षेत्र-२ मधील कुडवली एमआयडीसीमधील सुमगो इंजिीनीअरिंग कंपनीत पत्र्यांच्या शेडचे बांधकाम करीत असताना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : मुरबाड औद्योगिक क्षेत्र-२ मधील कुडवली एमआयडीसीमधील सुमगो इंजिीनीअरिंग कंपनीत पत्र्यांच्या शेडचे बांधकाम करीत असताना योगेश तानाजी केदार हा २२ वर्षांचा कामगार शेडवरून पडून ठार झाला. या अपघातावरून पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेची काळजी कशी घेतली जाते, हे दिसून आले. गेली अनेक वर्षे तो या कंपनीत काम करत होता.
पावसाळा तोंडावर आल्याने सुमगो कंपनीने छतावरील पत्रे फिट करण्यासाठी योगेशला ६० फूट उंच असलेल्या पत्र्याच्या शेडवर चढवले. मात्र, एवढ्या उंचीवर चढवल्यानंतर सुरक्षा बेल्ट देणे गरजेचे आहे.
मात्र, तो न दिल्याने योगेशचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याला गंभीर दुखापत झाल्याने मुरबाड शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दवाखान्यात नेण्यास उशीर झाल्याने त्याची प्रकृती अजूनच गंभीर झाल्याने रुग्णालयातच काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. नुकतेच २८ एप्रिलला योगेश याचे लग्न झाले होते.
या घटनेवरून मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा किती ढिसाळ आहे, हे दिसून येते. या घटनेची नोंद
मुरबाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.