रविवारच्या सायंकाळी ठाणेकरांनी अनुभवला काव्यानुभुतीचा एक नवीन कोलाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 08:53 PM2017-10-29T20:53:58+5:302017-10-29T20:54:19+5:30
वाढत्या कवी रसिकतेमुळे कवितांच्या कार्यक्रमात आणि सादरीकरणात सुद्धा विविध प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच एक अभिनव प्रयोग म्हणजे 'क'. हा कार्यक्रम ठाणेकर रसिकानी रविवारच्या सायंकाळी सहयोग मंदिर येथे अनुभवला.
ठाणे - वाढत्या कवी रसिकतेमुळे कवितांच्या कार्यक्रमात आणि सादरीकरणात सुद्धा विविध प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच एक अभिनव प्रयोग म्हणजे 'क'. हा कार्यक्रम ठाणेकर रसिकानी रविवारच्या सायंकाळी सहयोग मंदिर येथे अनुभवला. यावेळी प्रस्थापित कवि अरुण म्हात्रे आणि चार नवोदित कविंच्या न वाचलेल्या, न ऐकलेल्या कविता रसिकाना ऐकायला मिळाल्या.
गीतेश शिंदे, पंकज दळवी, संकेत म्हात्रे आणि कीर्ती पाटसकर या चार नव्या दमाच्या कवीनी म्हात्रे यांच्याबरोबर कवितांचे वाचन केले. सुरुवातीला कीर्ति हिने म्हात्रे यांची ओळख करून दिली. गीतेशने त्यांची "गेली 33 वर्षे" ही कविता सादर केली. त्यानंतर म्हात्रे यानी त्यांच्या या कवितेचा प्रवास उलगडला. पंकजने 'शब्द', गीतेशने 'सृजन', संकेतने 'कविता वाचन्याआधी', कीर्तिने 'ति जेव्हा पड़ते कविच्या प्रेमात' या कविता सादर झाल्या. यावेळी या चारही कविनी म्हात्रे यांना अनेक प्रश्न विचारुन त्यांच्या न वाचलेल्या कवितांचा प्रवास उलगडला. म्हात्रे यांची आजवर न ऐकलेली 'कविता करून झाल्या नंतरचा अटळ सन्नाटा' ही कविता रसिकांच्या वाहवाच्या दाद मध्ये सादर झाली. त्यांच्या अशा अनेक कविता सादर झाल्या, कविता म्हणजे क़ाय असे संकेतने त्याना विचारले असते ते म्हणाले कविता म्हणजे आपल्या आतल्या धड़धडीचे शब्दांत केलेले रूपांतर. त्यांच्या या उत्तराला रसिकानी 'क्या बात' ची दाद दिली. अधून मधून या चार कविनच्या अनेक कविता सादर झाल्या.