रविवारी कम्यूनीस्ट पार्टीचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:16 PM2018-07-24T15:16:18+5:302018-07-24T15:20:00+5:30
येथील ठाकुर्ली इमारत, नागु बाई, बीलव्दल या सगळया इमारतींमधील शेकडो रहिवाश्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या आधीही अनेक इमारती पडल्याने रहिवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्या घटनांना अनेक वर्षे झाली पण त्या जागेवरती गृहनिर्माण योजना राबवण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी, आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मौन आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी चव्हाण यांच्या वीर सावरकर रोडवरील जाणता राजा या कार्यालयासमोर रविवारी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या डोंबिवली कमिटीच्या माध्यमाने हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रेड स्टार महेश साळुंके यांनी दिली.
डोंबिवली: येथील ठाकुर्ली इमारत, नागु बाई, बीलव्दल या सगळया इमारतींमधील शेकडो रहिवाश्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या आधीही अनेक इमारती पडल्याने रहिवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्या घटनांना अनेक वर्षे झाली पण त्या जागेवरती गृहनिर्माण योजना राबवण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी, आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मौन आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी चव्हाण यांच्या वीर सावरकर रोडवरील जाणता राजा या कार्यालयासमोर रविवारी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या डोंबिवली कमिटीच्या माध्यमाने हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रेड स्टार महेश साळुंके यांनी दिली. कल्याण -डोंबिवली महापालिका क्षेत्रांमध्ये अनेक खाजगी व सरकारी जागेवरील इमारती आहेत. या महानगरपालिका हद्दीत शासकीय हॉस्पिटल मधे सर्वसामान्यांसाठी सुविधा नाही . नॅशनल बिल्डिंग कोड या केंद्र सरकारच्या नियमानुसार १५ हजार जनसंख्येमागे १ दवाखाना, तसेच १ लाख जनसंख्येला एक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल ची तरतूद आहे. पण त्या नियमांचे या महापालिका क्षेत्रात सर्रास उल्लंघन होत आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात