तोंडावर थुंकल्याचा सेना पदाधिकाऱ्यावर सुनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:47+5:302021-05-30T04:30:47+5:30

कल्याण : कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुकाप्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक एकनाथ पाटील हे आपल्या सुनेच्या तोंडावर थुंकले व ...

Sune accuses army officer of spitting in the face | तोंडावर थुंकल्याचा सेना पदाधिकाऱ्यावर सुनेचा आरोप

तोंडावर थुंकल्याचा सेना पदाधिकाऱ्यावर सुनेचा आरोप

Next

कल्याण : कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुकाप्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक एकनाथ पाटील हे आपल्या सुनेच्या तोंडावर थुंकले व त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, अशी तक्रार हर्षदा पाटील यांनी भाजप आमदारासोबत पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन केली. या घटनेची व्हिडिओ क्लिप पुरावा म्हणून त्यांनी सादर केला. सासरे एकनाथ पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

कल्याण ग्रामीण परिसरातील भोपर गावात राहणाऱ्या हर्षदा या एकनाथ पाटील यांच्या सूनबाई आहेत. सासरे वारंवार त्रास देतात, शिवीगाळ व मारहाण करतात, इतकेच नाही, तर हर्षदा यांच्या मुलीच्या अंगावरही धावून जातात, असे त्यांचे म्हणणे आहे. एकनाथ हे हर्षदा यांच्या तोंडावर थुंकल्याचा त्यांचा आरोप असून, पुराव्यादाखल त्यांनी व्हिडिओ दाखवला. सासऱ्याकडून होत असलेल्या त्रासाची माहिती शिवसेनेच्या नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात यश आले नाही, असे हर्षदा यांचे म्हणणे आहे. पोलीसही एकनाथ यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेत नसल्याने अखेरीस हर्षदा यांनी डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे दाद मागितली. चव्हाण यांनी भाजप नगरसेविका रविना माळी यांच्यासह हर्षदा यांना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे पाठवले. हर्षदा पाटील यांची सादर केलेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई केली जाईल, असे पानसरे यांनी सांगितले.

.........

सून हर्षदा ज्या व्हिडिओचा दाखला देत आहेत, तो दोन वर्षांपूर्वीचा आहे. आता आमच्यात कोणताही वाद नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या घरगुती वादाचा गैरफायदा घेऊन माझ्या बदनामीचा डाव रचला आहे.

-एकनाथ पाटील, विधानसभा संघटक, शिवसेना, कल्याण ग्रामीण

--------------------

वाचली

Web Title: Sune accuses army officer of spitting in the face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.