पावसाने डोंबिवलीकरांच्या दैनावस्थेची आयुक्त, सुनील जोशींनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 07:07 PM2019-08-03T19:07:07+5:302019-08-03T19:07:10+5:30

ह प्रभागात गळक्या दालनात बसायला सभापतींचा नकार

Sunil Joshi, Commissioner inspected of Dombivli rain | पावसाने डोंबिवलीकरांच्या दैनावस्थेची आयुक्त, सुनील जोशींनी केली पाहणी

पावसाने डोंबिवलीकरांच्या दैनावस्थेची आयुक्त, सुनील जोशींनी केली पाहणी

Next

डोंबिवली: शहरात पहाटेपासूनच पडलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी नागरिकांची दाणादाण उडवली होती. नांदिवली भागात प्रचंड पाणी जमा झाले होते, तर डोंबिवली पश्चिमेला राजू नगर, गरिबाचा वाडा, मोठा गाव आदी परिसरात दुपारनंतर खाडीच्या भरतीचे पाणी जमा झाल्याने रहिवासी हैराण झाले होते. नांदिवली, भोपर, संदप, भोपर, देसले पाडा, सागाव सोनारपाडा आदी भागात आयुक्त गोविंद बोडके, अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुनील जोशी आदींसह अन्य अधिका-यांनी शहरात सर्वत्र पाहणी दौरा केला. वस्तूस्थिती जाणून घेत जेथे समस्या भेडसावली त्या ठिकाणी तातडीने आपात्कालीन विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले. परंतू शहरातील सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा आयुक्तांनी केला.


त्यांनी पश्चिमेकडील विकास म्हात्रे यांच्या प्रभागातील खाडीकिनारा बघितला, तेव्हा मात्र पाणी नियंणत्रणात होते, परंतू दुपारनंतर मात्र पाणी भरल्याने काहीशी समस्या उद्भवण्याची शक्यता होती असे ते म्हणाले, पण तरीही स्थिती नियंत्रणात असल्याचे बोडके म्हणाले. नांदिवली नालानजीकच्या श्री स्वामी समर्थ मठासमोरील तुंबलेल्या पाण्यात आयुक्त बोडके गेले, त्यांनी त्या ठिकाणची स्थिती तातडीने आटोक्यात आणण्यासाठी आपात्कालीन स्थितीला आदेश दिले. त्यानूसार नांदिवली येथील मठानजीक दोन इमारतींच्या भिंती तोडून पाण्याला त्यांनी वाट करुन दिली. त्यावेळी माजी सरपंच रवी म्हात्रे उपस्थित होेते. भोपर येथील नगरसेविका रवीना अमर माळी, संदीप माळी यांच्या प्रभागात त्यांनी पाहणी केली. संदीप माळींच्या प्रभागात रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे त्या ठिकाणी समस्या उद्भवली होती.त्याची पाहणी आयुक्त, जोशींनी केली. त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी वाहतूकीला अडथळा झाला होता.


ह प्रभाग महापालिकेच्या इमारतीला पाणी गळतीची समस्या भेडसावल्याने सभापती वृषाली रणजीत जोशी यांनी मी बसायचे कुठे? आणि कसे? असा सवाल करत पश्चिमेला कोणी वाली आहे की नाही असे म्हंटले. प्रशासनाचा निषेध करत त्यांनी थेट दालनात छत्री उघडली आणि खूर्चीत ठाण मांडले. अशा ओलाव्यात, दुर्गंधीत थांबायचे कसे असा संताप व्यक्त करत प्रशासनाच्या नाकर्तेपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. नागरिकांना प्रचंड समस्या भेडसावत असून ते त्यांचे गा-हाणे मांडण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात येतात. परंतू सभापतीच्या दालनात प्रचंड पाणी गळती झाली असून भिंतीमधून, खिडक्यांमधून पाणी गळत आहे. त्यामुळे कार्पेट पूर्ण ओले झाले असून कागदपत्रही भिजली असल्याचे त्यांनी दाखवले. सततच्या पाणी झिरपण्यामुळे दालनात ओलावा असून सगळीकडे बुरशी पकडली आहे. अशा गैरसोयीच्या ठिकाणी बसून नागरिकांचे प्रश्न कसे सोडवायचे असे त्या म्हणाल्या. ही स्थिती आजची नसली तरी वर्षानूवर्षे त्याकडे कानाडोळा का केला गेला? असा सवाल माजी नगरसेवक रणजीत जोशी यांनी केला. इमारतीची वेळच्या वेळी डागडुजी आणि पाणी झिरपू नये यासाठी काही उपाययोजना का केल्या नाहीत असे ते म्हणाले.


दिवसभरात रेल्वे स्टेशन परिसरात सर्वत्र पाणी जमा झाले होते. डॉ. राथ रोड, पाटकर रस्ता या ठिकाणी पाणीच पाणी झाल्याने ग आणि फ प्रभाग समितीमधील आपात्कालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले होते. कोपर येथेही नाला भरुन वाहणारा होता. त्या ठिकाणीही महापौर विनिता राणे यांनी पाहणी केली होती. नागरिकांनी आवश्यकता भेडसावल्यासच बाहेर पडावे असे आवाहन महापालिकेचे प्रभाग अधिकारी दिपक शिंदे यांनी दिले होते.


दरम्यान, म्हात्रे नगर येथे रेल्वे हद्दीतून तीन साप रहिवाश्यांच्या सोसायट्यांमध्ये आल्याने नागरिकांची धावपळ झाली. त्याची दखल घेत नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी तातडीने रेल्वे अधिका-यांची भेट घेतली. डोंबिवली स्थानक प्रबंधकांनी पेडणेकर यांच्या अर्जावरच सोसायटीच्या रहिवाश्यांनी कचरा रेल्वे हद्दीत टाकणे बंद करावे असे आवाहन करणारा शेरा दिल्याने पेडणेकर संतापले. ते म्हणाले की, रेल्वे हद्दीतून साप येतात, त्यावर उपाययोजना करायची सोडून असा शेरा देणे म्हणजे नागरिकांची थट्टा करणे झाले.यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रेल्वे हद्दीतील झाडे वाढल्याने समस्या भेडसावत असून अनेक वर्षे हा प्रश्न जैसे थे असून कोब्रा जातीचे नाग तेथे असून कोणाचे बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल त्यांनी केला. कोपर, ठाकुर्ली येथील रेल्वे अधि-यांनाही त्यांनी यासंदर्भा माहिती दिली आहे. दुपारी काही वेळ पावसाचा जोर ओसरला होता, पण संध्याकाळी मात्र पावसाची रिपरीप सुरुच होती.

Web Title: Sunil Joshi, Commissioner inspected of Dombivli rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.