ठाण्यात गुढीपाडव्या दिवशी गजबजलेले ठाणे झाले कोरोनामुळे सुनेसुने, कोरोनमुक्त देशासाठी केली प्रार्थना 

By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 25, 2020 06:57 PM2020-03-25T18:57:13+5:302020-03-25T19:06:47+5:30

गुढीव्याच्या दिवशी गजपाडबजलेले ठाणे आज सुनेसुने दिसून येत होते.  

Sunusune prays for coronet-free country due to corona erupted in Thane | ठाण्यात गुढीपाडव्या दिवशी गजबजलेले ठाणे झाले कोरोनामुळे सुनेसुने, कोरोनमुक्त देशासाठी केली प्रार्थना 

ठाण्यात गुढीपाडव्या दिवशी गजबजलेले ठाणे झाले कोरोनामुळे सुनेसुने, कोरोनमुक्त देशासाठी केली प्रार्थना 

Next
ठळक मुद्देठाण्यात गुढीपाडव्या दिवशी गजबजलेले ठाणे झाले कोरोनामुळे सुनेसुने कोरोनमुक्त देशासाठी केली प्रार्थना शोभयात्रेची परंपरा कोरोनामुळे आज 19 वर्षांनी खंडित

प्रज्ञा म्हात्रे 

ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात निघणाऱ्या शोभयात्रेची परंपरा कोरोनामुळे आज 19 वर्षांनी खंडित झाली. दरवर्षी शोभायात्रेत एकत्र येणारे ठाणेकर आज भाजी मार्केट, मेडिकल, किराणा स्टोअर्स, डेअरीमध्ये गर्दी करत होते. दरवर्षी शोभयात्रेमुळे गजबजलेले ठाणे आज सुनेसुने वाटत होते. असे असले तरी एक वर्षे शोभायात्रा  झाली नाही तरी हरकत नाही परंतु देशावर आलेल्या या कोरोनाच्या संकटाला आपण एकजुटीने मात करूया अशा भावना ठाणेकर व्यक्त करीत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे न झालेली शोभायात्रा ही कायम स्मरणात राहील असे मतही ठाणेकर व्यक्त करीत आहेत. 

          गुढीपाडव्याच्या दिवशी गेली 18 वर्षे ठाणे शहरात शोभायात्रा काढली जाते. यंदाचे हे 19 वे  वर्षे होते. ठाणे शहर हे विस्तारलेले शहर आहे त्यामुळे या मुख्य यात्रेत दूर वर राहणाऱ्या ठाणेकरांना सहभागी होणे अशक्य असल्याने ते आपापल्या परिसरात शोभायात्रा आयोजित करतात. कोपरी, ब्रह्माड, कळवा, खरिगाव, वसंत विहार, लोढा लक्झओरिया अशा विविध ठिकाणी उपयात्रा निघतात. श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने श्री कौपीनेश्वर मंदिरापासून चिंतामणी चौक - दगडी शाळा- गजानन महाराज मठ-तीन पेट्रोल पंप- हरिनिवास चौक - गोखले रोड- राम मारुती रोड-तालावपाळी मार्गे येऊन ही यात्रा मंदिराजवळ विसर्जित होते. बहुसंख्य ठाणेकर यात सहभागी होतात. उपाशी, मंगलमयी वातावरणात ही शोभायात्रा पार पडते. विविधतेने नटलेल्या या शोभयात्रेला कोरोनामुळे मात्र ब्रेक लागला. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील सर्व शोभायात्रा रद्द करण्याचे आयोजकांना आदेश दिले. आयोजकांनीही त्यांच्या आदेशाचे पालन करत यात्रा होणार नसल्याचे जाहीर केले. शोभायात्रेमध्ये खंड पडला याचे दुःख ठाणेकरांना नाही. कारण राष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा उद्देश सर्वांसमोर आसल्याने ता संकटाला दूर करण्याची इच्छा सर्व जण व्यक्त करीत आहेत. सरकारच्या आदेशाचे पालन करून या संकटाला पळवून लावूया अशाच इच्छा सर्व जण व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे सोशल मिडयावर देखील पाडव्याच्या शुभेच्छा या कोरोनामुक्तीच्या दिल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दहावीत शिकणारी गौरी राजे ही दरवर्षी वेशभूषा करून शोभायात्रेत सहभागी होत असते. यंदा ही यात्रा होत नसली तरी ती या दिवशी देशाने कोरोना या संकटातून बाहेर यावे अशी प्रार्थना करीत असल्याचे तिने सांगितले.

----------------------------------------------

कोरोना हे संकट अचानक आलेले आहे. त्यामुळे या संकटाला एकजुटीने उत्तर दिले पाहिजे. जसे शोभायात्रेत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व एकत्र येऊन पाडवा साजरा करतात तसेच एकजुटीने एकत्र येऊन 21 दिवस सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केले तर कोरोनावर आपण मात करू. हा गुढीपाडवा चिरसमरणात राहील. 21 दिवसात रुग्ण वाढण्याऐवजी कमी झाले तर ते खूप मोठे योगदान असेल.

- प्रा. विद्याधर वालावलकर, विश्वस्त, श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास

---------------------------------------------------------------

सांस्कृतिक शहरांमध्ये अग्रेसर असलेलं   आपलं ठाणे शहर आहे. मग ते गुढीपाडव्याची मिरवणूक असो किंवा दिवाळी पहाट असो व अथवा असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असो ठाणेकरांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगी असतो.ठाणेकर मंडळी अगदी हौशीने सगळे सण साजरे करत असतात..परंतु माझ्या माहिती नुसार हे पहिलंच वर्ष आहे की ज्या वर्षी गुढीपाडव्याला कुठलीही शोभायात्रा नाही..पहिल्यांदाच लोकं आप आपल्या घरी राहून गुढीपाडवा साजरा करतायत.प्रत्येकाला माहितीये आपल्या देशावरच नाही तर संपूर्ण जगावर ह्या करोना सारख्या महामारीच संकट आलय आणि आपल्यालाच ह्या संकटाचा सामना करायचाय पण तो देखील घरी बसून.. खरं तर आपल्याला एवढे दिवस घरी बसून राहणं हे तितकं सोपं नसणार आहे परंतु जर ह्या महामारी वर मात करायची असेल तर ते आपल्याला सोपं करावं लागेल...आणि मला माहितीये की ह्या वर्षी जर गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रा नसेल निघाली तर पुढच्या वर्षी आणखी धूम धडाक्यात ती निघेल,पण त्या करता आपल्याला आता घरीच राहावं लागेल आणि आपली काळजी घ्यावी लागेल आणि ह्या महमारील पळवून लावावं लागेल.

-आदित्य नाकती

--------------------------------------------------------------

गुढीपाडव्याला घरी राहण्याचं हे माझं पहिलंच वर्ष. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वागतयात्रा न काढण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. यानिमित्ताने केवळ घरच्यांसोबत नूतन वर्ष साजरे करण्याचा योग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी विनंती केल्यानुसार प्रत्येकाने आपापल्या घरीच राहून नवीन वर्षाचे स्वागत करावे आणि पुढील २१ दिवस घरीच राहावे. या नववर्षाचे स्वागत घरी राहूनही तेवढ्याच आनंदाने करता येऊ शकते. यासंदर्भात सर्वांनी काळजी घ्यावी असे मला वाटते. घरी राहणे ही सक्ती नसून संधी आहे, असा विचार केल्यास आपण काही अद्वितीय घडवून आणू शकू आणि हा गुढीपाडवा आपल्या स्मरणात कायमचा राहू शकेल.

- सुरभी वालावलकर, संयोजिका , सायकल रॅली

--------------------------------------------------------------

मराठी नववर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा! चैतन्याची आणि सकारात्मकतेची गुढी उभारून नववर्षाची सुरुवात आपण करतो.

आजचा दिवस सुद्धा ऊर्जा देणारा आहे. सध्या जगामध्ये खूप मोठं संकट जरी उद्भवल असलं तरी आजच्या सकारात्मकतेने आपण सगळे नक्कीच ह्यावर मात करू अशी आशा आहे.

- दिव्येश बापट

Web Title: Sunusune prays for coronet-free country due to corona erupted in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.